Krushi Puraskar Arj: राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, संस्था आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान केला जातो. २०२५ वर्षापासूनचे हे विविध कृषी पुरस्कार आता पूर्णतः ऑनलाइन प्रणालीद्वारे राबविण्यात येणार असून, अकोला जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी बुधवार (ता. १५) पूर्वी आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी केले आहे..शेतीत नवनवीन प्रयोग करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न असे विविध मानाचे पुरस्कार प्रदान केले जातात..Agriculture Award: कृषी पुरस्कार अर्ज ऑनलाइन.यापूर्वी हे पुरस्कार मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रस्तावाच्या चार प्रती ऑफलाइन पद्धतीने सादर कराव्या लागत होत्या. यासाठी मोठा खर्च आणि वेळ लागत असे. ही पारंपरिक पद्धत वेळखाऊ असल्याने अनेक इच्छुक शेतकरी अर्ज करू शकत नव्हते. .या पार्श्वभूमीवर, पुरस्कार प्रक्रियेत पारदर्शकता, सुलभता आणि गतिमानता आणण्यासाठी कृषी विभागाने स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://krishi.maharashtra.gov.in ‘कृषी पुरस्कार’ या टॅबमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे..Global AI Award India 2026: ‘एडीटी’ला ‘ग्लोबल ‘एआयॲवॉर्ड इंडिया २०२६’ जाहीर.या ऑनलाइन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना आता घरबसल्या अर्ज करता येणार असून, कागदपत्रांच्या छपाईचा, झेरॉक्सचा आणि प्रवासाचा आर्थिक भार कमी होणार आहे. एकदा अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा द्यावी लागणार नाहीत आणि आपला अर्ज कोणत्या टप्प्यावर आहे याची माहितीही शेतकऱ्यांना सहज मिळणार आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन पुरस्कारांची विश्वासार्हता अधिक बळकट होणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.