Dairy Farmers Issue: यंदा दुष्काळामुळे खरिपातील पिकांची स्थिती बिकट आहे. परंतु काही प्रकल्पांत जलसाठा मुबलक आहे. रब्बीतून चारा मिळेल. पण पुढील काही महिने चाऱ्याची समस्या राहू शकते. त्यात चारा मुबलक नसल्याने सध्या अडचणी येत आहेत. .कमी पावसामुळे मका, बाजरी व इतर पिके खराब झाली आहेत. काही भागात फक्त चारा हाती येईल, अशी स्थिती आहे. मागील वेळेस ओल्या दुष्काळामुळे शिवारात पिके खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पुरेसा चाराही लागला नाही, यामुळे महाग चारा घ्यावा लागला होता. यंदा कोरडा दुष्काळ अडचणीत आणू शकतो, अशी भिती आहे. .Beed Fodder Shortage: बैठकांचा धडाका, बांधावर मात्र चाऱ्याचा ठणठणाट.खानदेशात मागील पावसाळ्यात पाऊस होता. वार्षिक सरासरीच्या 110 टक्के इतका पाऊस झाला. मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये सरासरी चांगला जलसाठा उन्हाळ्यात होता. धुळ्यातील शिंदखेडा, धुळे, साक्री, जळगावातील चाळीसगाव, अमळनेर, बोदवड आदी भागात स्थिती फारशी गंभीर नव्हती..Livestock Fodder Shortage: दुष्काळात चाऱ्यासाठी उसाच्या वाड्यावर भिस्त.पण यंदा धुळे, साक्री, शिरपूर या तीन तालुक्यांतील एकूण २८ महसूल मंडळांत दुष्काळसदृश परिस्थिती आहे. पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला सतत बैठका व नियोजन करावे लागेल, असे दिसत आहे. जेथे शाश्वत जलस्रोत आहेत, त्याच भागात रब्बी येईल. अशाच भागात चारा मुबलक राहील. सध्या चारा आहे, पण दोन महिन्यानंतर अडचणी येतील, अशी भिती आहे..टँकरचीही गरज भासणारग्रामीण भागात सद्यःस्थितीला जनावरांना चाऱ्यासह पाणी आहे. पण पुढील काही महिन्यांनंतर टंचाई जाणवू शकते. टँकरद्वारे पाणी आणण्याची वेळ यंदा चाळीसगाव, पारोळा, धुळ्यातील धुळे, साक्री भागात येवू शकते, अशीही समस्या तयार होत आहे.