Dhule News: भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार धुळे महापालिका क्षेत्रात २०२७ ची जनगणना डिजिटल पद्धतीने राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज होत आहे. नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाइन भरण्यासाठी (Self Enumeration) १ ते १५ मे २०२६ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे..जनगणना-२०२७चे कार्यसुलभ व्हावे यासाठी धुळे महापालिका क्षेत्राचे चार झोन निश्चित करण्यात आले आहेत. तसेच, अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त ‘प्रधान जनगणना अधिकारी’ तर उपायुक्तांची ‘शहर जनगणना अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जनगणनेच्या या संपूर्ण प्रक्रियेसाठी एक मास्टर ट्रेनर व ३२ फिल्ड ट्रेनर प्रशिक्षण देणार आहेत..IAS Ashima Mittal: जनगणनेची कामे विहित कालावधीत पूर्ण करा.जनगणनेचे टप्पे असे...नागरिकांना १ ते १५ मे २०२६ दरम्यान स्वयं- नोंदणी (Self Enumeration) करता येईल. नागरिक अधिकृत पोर्टलवर लॉगिन करून आपल्या कुटुंबाची माहिती स्वतः भरू शकतील. त्यानंतर पहिल्या टप्प्यात १६ मे ते १४ जून २०२६ दरम्यान ‘घरांची यादी’ आणि ‘गृह जनगणना’ केली जाईल. यामध्ये घरांची माहिती आणि मूलभूत सुविधांची नोंद होईल..दुसरा टप्पा १ ते २८ फेब्रुवारीदरम्यान राबविण्यात येईल. या काळात प्रत्यक्ष ‘लोकसंख्या गणना’ करण्यात येईल. १ मार्च २०२७ रात्री बारा हा जनगणनेचा अधिकृत संदर्भ दिनांक असेल. या टप्प्यात कुटुंबातील प्रत्येक सदस्याची वैयक्तिक माहिती संकलित करण्यात येणार आहे. धुळे महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी जनगणनेच्या या कार्यास सहकार्य करावे व अचूक माहिती प्रदान करावी, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे..Tiger Census: तांत्रिक अडचणीमुळे जिल्ह्यात पुन्हा होणार व्याघ्रगणना.क्षेत्रीय कार्यालये व अधिकारीक्षेत्रीय कार्यालय-१ : नवरंग पाण्याची टाकी इमारत, देवपूर (प्रभाग- १, २, ४, ५, ६, ७ साठी), सहायक आयुक्त तथा चार्ज सेन्सस ऑफीसर- किशोर शिंदे.क्षेत्रीय कार्यालय-२ : मनपा शाळा नं. २, सुभाष पुतळ्याजवळ (प्रभाग- ३, ११, १२, १५ साठी), सहायक आयुक्त तथा चार्ज सेन्सस ऑफिसर- सागर जकातदार..क्षेत्रीय कार्यालय-३ : मनपा शाळा नं. ५, मनोहर टॉकीजजवळ (प्रभाग- १३, १४, १६, १८, १९साठी), सहायक आयुक्त तथा चार्ज सेन्सस ऑफीसर- राजेंद्र माईनकर.क्षेत्रीय कार्यालय-४ : अशोक नगर जलकुंभ, लेनिन चौक (प्रभाग- ८, ९, १०, १७), सहायक आयुक्त तथा चार्ज सेन्सस ऑफीसर- किशोर वाघ..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.