Panchganga River Update: कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात रविवारीही पावसाच्या जोरदार सरी झाल्या. रविवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी ५२ मिमि पाऊस झाला. सर्वदूर पाऊस सुरु झाल्याने समाधानकारक वातावरण निर्माण झाले. .सद्यःस्थितीत रेल्वे वाहतूक पूर्णपणे सुरळीत असून कोणतीही रेल्वे सेवा विस्कळीत झालेली नाही. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीस कोणताही अडथळा नाही. मात्र अतिवृष्टीमुळे २ राज्यमार्ग, २ प्रमुख जिल्हा मार्ग, २ ग्रामीण मार्ग आणि १ इतर जिल्हा मार्ग असे एकूण ७ रस्ते वाहतुकीसाठी बाधित झाले आहेत. संबंधित यंत्रणांकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. .Kolhapur Rain Update : कोल्हापुरला पावसाने झोडपले, आणखी दोन दिवस वादळी पावसाची शक्यता.पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथे पाणीपातळी २८ फूट ३ इंच, शिरोळ बंधारा येथे ३६ फूट आणि नृसिंहवाडी येथे ३१ फूट असून तिन्ही ठिकाणी नदीची पाणीपातळी इशारा पातळीपेक्षा खाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या भागात सध्या कोणताही तातडीचा पूरधोका निर्माण झालेला नाही. जिल्ह्यातील २९९ बंधाऱ्यांपैकी ३१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत..Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी, पुरामुळे १२२ कोटींचे नुकसान.राधानगरी धरणामध्ये ३२ टक्के पाणीसाठा असून धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद आहेत. तुळशी धरणात ३८ टक्के, वारणा धरणात २४ टक्के आणि दूधगंगा धरणात ८ टक्के पाणीसाठा आहे. वारणा व दूधगंगा धरणातून प्रत्येकी १०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे..रविवारी (ता. ५) सकाळी आठ पर्यंतचा पाऊस असा मिमी मध्येगगनबावडा (१४३.१ ) येथे सर्वाधिक पाऊस झाला असून, त्यापाठोपाठ आजरा (६७.६ ), चंदगड (६५.३ ), कागल (६०.२ ), भुदरगड (८५.९ .), पन्हाळा (५८.३ .), शाहूवाडी (४६.९ ), गडहिंग्लज (४३.), करवीर (४०.१ ), राधानगरी (८१ ), हातकणंगले (२०.९ ) शिरोळ (१६.८ )..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.