Latur News: जळकोट तालुक्यात रब्बी हंगामामधील गव्हाचे क्षेत्र वाढल्याने आणि पोषक हवामानामुळे पीक जोमदार आल्याने यंदा गव्हाचे सरासरीपेक्षा अधिक उत्पादन होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे परिसरात गव्हाच्या काढणीसाठी हरियाना व पंजाब राज्यातून हार्वेस्टर यंत्रे दाखल झाली असून लवकरच काढणीला वेग येण्याची अपेक्षा आहे..तालुक्यातील सोनवळा, माळहिप्परगा, कुणकी, अतनूर, गव्हाण, घोणसी आदी गावांमध्ये यंदा एक हजार हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी करण्यात आली आहे. यातील बहुतांश शेतकऱ्यांनी एचडी-२१८९ तसेच लोक-१ या गव्हाच्या वाणांना पसंती दिली आहे. सध्या गव्हाची काढणी मोठ्या प्रमाणात सुरू झाली नसली तरी विविध रस्त्यांवर कॉम्बाईन हार्वेस्टर यंत्रे उभी असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. .Wheat Production: उष्णतेच्या लाटांचा गहू उत्पादनावर परिणाम नाही; केंद्रीय कृषिमंत्र्यांचा दावा.यंदा रब्बी हंगामात हवामान पोषक राहिल्यामुळे गव्हाचे पीक चांगले जोमात वाढले आहे. त्यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उत्पादन मुबलक प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने गव्हाच्या दरात फारशी तेजी राहणार नाही, अशी चर्चा व्यापाऱ्यांमध्ये सुरू असल्याचे शेतकरी संतोष पवार यांनी सांगितले..Wheat Production : पाऊस, गारपिटीमुळे गहू उत्पादनाला फटका.तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी ऊस व फळबागांमध्येही गव्हाचे आंतरपीक घेतल्याचे दिसून येत आहे. कॉम्बाइन हार्वेस्टर यंत्राच्या साहाय्याने अवघ्या तास-दीड तासांत गव्हाची काढणी व मळणी पूर्ण होत असल्याने शेतकऱ्यांना मोठी सोय होत आहे. .हार्वेस्टरद्वारे काढणी व मळणीसाठी प्रति एकर अडीच हजार रुपये दर घेतला जात आहे. हा दर ठिकाणानुसार कमी-जास्त असू शकतो. यंदा एका एकरातून सरासरी २० क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन मिळेल, असा अंदाज शेतकरी अरविंद नागरगोजे यांनी व्यक्त केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.