Reservoir Levels Decline: उन्हाळा संपून पावसाळ्याचे वेध लागले असले, तरी धाराशिव जिल्ह्यातील पाणीटंचाईची तीव्रता अद्याप कमी झालेली नाही. जिल्ह्यातील १ मोठा, १७ मध्यम आणि २०८ लघू प्रकल्प अशा एकूण २२६ जलप्रकल्पांमध्ये मिळून आता केवळ १२.७७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. २२६ पैकी २०२ प्रकल्पांची स्थिती चिंताजनक आहे. गेल्यावर्षी याच काळात हा साठा २८.१७ टक्के इतका होता, ज्यामुळे यावर्षी प्रशासनासह नागरिकांची चिंता कमालीची वाढली आहे..जिल्ह्यातील १७ मध्यम प्रकल्पांमध्ये एकूण २०५.५२२ दलघमी उपयुक्त साठवण क्षमतेच्या तुलनेत आजमितीस केवळ २४.९५७ दलघमी (१२.१४ टक्के) उपयुक्त साठा उपलब्ध आहे. तेरणा मध्यम प्रकल्पात २८.३५ टक्के, रूई प्रकल्पात १४.२० टक्के, वाघोली बृ.ल.पा.मध्ये २३.५० टक्के, तर सोनगिरी सा.त. प्रकल्पात तुलनेने चांगली म्हणजे ५२.२१ टक्के पाणी पातळी आहे. चांदणी प्रकल्पातील (परंडा) उपयुक्त साठा शून्य टक्के आहे. .Water Scarcity: मंचर शहरावर पाणीटंचाईचे सावट.ऑटोमॅटिक गेट्समुळे हे धरण १०० टक्के भरत नसल्याची नोंद अहवालात आहे. खंडेश्वर प्रकल्प (परंडा) देखील शून्य टक्के असून, धरणाचा भराव खचल्यामुळे सध्या तिथे दुरुस्तीचे काम सुरू आहे. साकत प्रकल्पात (परंडा) उपयुक्त साठा शून्य टक्क्यावर आला आहे..Ahilyanagar Water Crisis: अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढतेय.पर्जन्यमानाची स्थिती, पावसाची प्रतीक्षामहसूल विभागाच्या नोंदीनुसार, १ मे २०२५ पासून १० जून २०२६ पर्यंत जिल्ह्यात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्याचे अपेक्षित वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७७०.७ मिमी. आहे. मात्र, आतापर्यंत कळंब तालुक्यात १३९.८० मिमी., वाशी तालुक्यात १२२.१० मिमी, भूममध्ये १२०.२० मिमी, परंड्यात १०५.६० मिमी, उमरग्यात ९३.८० मिमी, तुळजापूर तालुक्यात ५५.६० मिमी, धाराशिव तालुक्यात ५२.५० मिमी, तर लोहारा तालुक्यात ३५.५० मिमी पाऊस झाला. आहे. जिल्ह्यात एकूण सरासरी ११.७६ टक्के पाऊस झाला. यामुळे आगामी काळात दमदार पाऊस झाला नाही, तर खरीप हंगामाच्या पेरण्यांसोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक जटील होण्याची शक्यता आहे..कुठल्या तालुक्यात किती पाणीजिल्ह्यातील पाणीसाठ्यांचे विश्लेषण केले असता, बहुतांश लघू व मध्यम प्रकल्प ‘तळ गाठण्याच्या’ तयारीत आहेत, तर काही पूर्णपणे कोरडे पडले आहेत. परंडा तालुक्यातील सिना कोळेगाव मोठ्या प्रकल्पाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. या धरणाची एकूण उपयुक्त साठवण क्षमता ८९.३४८ दशलक्ष घनमीटर (दलघमी) आहे. मात्र, प्रत्यक्षात सध्या त्यात केवळ ५.५७६ दलघमी (६.२४ टक्के) उपयुक्त साठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी या धरणात २६.१३ टक्के पाणी होते. जिल्ह्यातील एकूण २०८ लघू प्रकल्पांची उपयुक्त क्षमता ४३५.४९४ दलघमी आहे. परंतु, सध्या त्यात केवळ ६२.७१२ दलघमी (१४.४० टक्के) पाणी शिल्लक आहे. धाराशिव तालुक्यातील येवती, टाकळी, सांजा सा.त. १ व २, आळणी सा.त. २, खामसवाडी यांसह अनेक तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.