Kharif Season: नुकत्याच झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांची लगबग सुरू झाली असून, शेतकरी सोयाबीन बियाणे व खते खरेदीसाठी बाजारात गर्दी करत आहेत. दुसरीकडे ऊस पिकासाठी युरियाची मागणी वाढली आहे. मात्र, ऐन गरजेच्या वेळीच बाजारात युरिया आणि डीएपी खतांचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. .त्यातच मूळ खतासोबत इतर महागडी औषधे किंवा पर्यायी खते खरेदी केल्याशिवाय युरिया दिला जात नसल्याने केंद्रचालकांकडून ‘लिंकिंग’ सुरूच असल्याच्या तक्रारी येत असून, शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे..DAP Fertilizer Shortage: पेरणीच्या तोंडावर डीएपी खताचा तुटवडा.बुधवारी (ता. दहा) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर, बार्शी नाका, सांजा रोड आदी भागांतील कृषी सेवा केंद्रांवर युरिया आणि डीएपी खरेदी करण्यासाठी शेतकरी आले होते. मात्र, बहुतांश केंद्रांवर खत उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्याने लांबून आलेल्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागले. खतांचा साठा असूनही काही चालक कृत्रिम टंचाई निर्माण करत असल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे..Urea Fertilizer Shortage: अकोटमध्ये युरियासाठी पुन्हा रांगा; मागणी कायम; खतसाठा शिल्लक असल्याचा प्रशासनाचा दावा.कृषी केंद्रचालकांवर कारवाईची मागणीकेवळ युरिया मागितल्यावर कृषी केंद्रचालक तो देत नाहीत. युरिया हवा असेल, तर सोबत इतर अनावश्यक खते किंवा महागडी कीटकनाशके, औषधे खरेदी करण्याची तयारी दाखविल्यावरच युरिया दिला जातो, असे जहागीरदारवाडी येथील शेतकरी दादासाहेब मिसाळ यांनी सांगितले. हा प्रकार म्हणजे थेट गरिबांच्या खिशावर दरोडा टाकण्यासारखा असून, प्रशासनाने तत्काळ भरारी पथके नेमून या बेकायदेशीर ‘लिंकिंग’ करणाऱ्या आणि पर्यायी खते माथी मारणाऱ्या कृषी केंद्रचालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे..जिल्ह्यात दोन हजार ६०० टन युरियाचा साठा आलेला असून, कृषी केंद्रांमध्ये तो विक्रीसाठी उपलब्ध आहे. साठ्याची माहिती ऑनलाइन नोंदविण्यासाठी एक दिवस लागतो. त्यामुळे आज शेतकऱ्यांना तुटवडा जाणवला असेल. मात्र, उद्यापासून युरिया शेतकऱ्यांना मिळेल.- नागेश पाटील, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद, धाराशिव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.