Dharashiva News: यंदाच्या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू, हरभरा ही पिके घेण्यावर भर दिला आहे. दुसरीकडे तीळ पीक मात्र यंदा पेरणीतून हद्दपार झाले आहे. सूर्यफुलाच्या पेरणीकडेही शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे..दरवर्षी शेतकरी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात ज्वारीचे पीक घेतात; परंतु गेल्या काही दिवसांपासून हरभरा पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. ज्वारीचे पीक घेतल्यास पशुधन असलेल्या शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होतो. घरी वर्षभर उदरनिर्वाहासाठी ज्वारी धान्य मिळते व पशूला कडबा उपलब्ध होतो. .Rabi Sowing: हरभरा अधिक; गव्हाची पेरणी वाढतेय.ज्या शेतकऱ्यांकडे पशुधन नाही, असे शेतकरी कडब्याची विक्री करतात. त्यातून त्यांना चार पैसेही मिळतात. ज्यांच्याकडे मुबलक पाणी उपलब्ध आहे, असे शेतकरी गहू पीक घेतात; परंतु गेल्या पाच-सहा वर्षांत ज्वारी, गव्हाचे क्षेत्र कमी करून शेतकऱ्यांचा कल हरभरा पीक घेण्याकडे वाढला आहे. याशिवाय काही शेतकरी करडईचे पीकही घेतात..Rabi Sowing: पुणे विभागात ७३ टक्के रब्बी क्षेत्रावरील लागवड पूर्ण.यंदा ज्वारीचे एक लाख १६२ हजार ५९९ हेस्टर प्रस्तावित क्षेत्र असून, यापैकी एक लाख ३८ हजार १०५ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. गव्हाचे प्रस्तावित क्षेत्र २५ हजार ८५५ हेक्टर असून, यापैकी १९ हजार ८४ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे प्रस्तावित क्षेत्र दोन लाख आठ हजार ५७३ असून, एक लाख ६६ हजार ९७१ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. या प्रमुख पिकांबरोबरच काही वर्षांपूर्वी शेतकरी रब्बी हंगामात तीळ, सूर्यफुल, करडई ही पिकेही घेत असत. सध्या काही शेतकरी करडईचे पीक घेत असले तरी गेल्या काही वर्षांच्या तुलनेत या पिकाच्या क्षेत्रातही घट होत आहे..अनेक शेतकरी सूर्यफुलाला पसंती देत असत. सूर्यफुलाच्या उगवणीनंतर गावातील शिवारे पिवळी दिसायची; परंतु गेल्या काही वर्षांत या पिकांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्यामुळे मोजकेच शेतकरी आता सुर्यफुलाची पेरणी करीत असल्याची स्थिती आहे. गेल्या काही वर्षांपासून सूर्यफुलाच्या क्षेत्रातही घट होत चालली आहे. यंदा सूर्यफुलाचे प्रस्तावित क्षेत्र ५६९ हेक्टर होते. यंदा केवळ २४ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. तिळाचे पीक घेणे तर शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षांपासून बंदच केले आहे. यंदा एकही हेक्टरमध्ये तिळाची पेरणी झालेली नाही. त्यामुळे रब्बी हंगामात तीळ पीक यंदा पेरणीतून हद्दपार झाल्याची स्थिती आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.