Village Development: जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक नागरिकाला दररोज प्रतिव्यक्ती ५५ लिटर शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. शुद्ध पाणी उपलब्ध झाल्यास जलजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविता येईल. .जलजीवन मिशनच्या ज्या योजना अद्याप अपूर्ण आहेत, त्या संबंधित कंत्राटदारांकडून तातडीने पूर्ण करून गावे ‘हर घर जल’ घोषित करण्यासाठी गटविकास अधिकारी व उपअभियंत्यांनी संबंधित सरपंचांसमवेत बैठका घेऊन नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले..Jal Jeevan Mission Corruption: ‘जलजीवन’च्या गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित करा.धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जलजीवन मिशनच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कटकधोंड, जिल्हा भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक मांजरमकर आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांची प्रमुख उपस्थिती होती..Clean Drinking Water: जलदूतांची उपासमार.जिल्ह्यातील काही तालुक्यांचा आकांक्षी तालुक्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. या तालुक्यांतील जलजीवन मिशनच्या नळपाणी योजनांना प्राधान्य देऊन त्या तातडीने पूर्ण कराव्यात. संबंधित गावे ‘हर घर जल’ घोषित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही वेळेत पूर्ण करावी..ज्या ग्रामपंचायतींकडून अद्याप दानपत्रे प्राप्त झालेली नाहीत, ती गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने मिळवून घ्यावीत.म्हाडदळकर यांनी ७० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण केलेल्या कंत्राटदारांच्या देयकांबाबत नियमानुसार कार्यवाही करावी, असे आदेश दिले..कटकधोंड यांनी ५०८ गावांसाठी जलजीवन मिशनच्या ५९४ योजना मंजूर असून, त्यापैकी ३४६ योजना पूर्ण झाल्याची माहिती दिली. एप्रिलमध्ये १६, मेमध्ये ३६ आणि जूनमध्ये २७ योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ नऊ योजना पूर्ण होऊ शकल्या. तसेच ७२० गावांपैकी ३ जूनपर्यंत २०६ आणि ४ ऑगस्टपर्यंत २९७, अशी एकूण ५३३ गावे ‘हर घर जल’ घोषित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.