MLA Petition to CM regarding Agricultural Loan Distribution: राज्यातील काही बँकांचा कूलिंग कालावधी (पीरियड) तीन वर्षांहून अधिक असल्याने शेतकऱ्यांना पीककर्ज पुरवठा केला जात नाही. त्यामुळे कूलिंग कालावधीबरोबर सीबिल सक्ती रद्द करावी, अशी मागणी धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. .ज्या शेतकऱ्यांनी ओटीएसचा लाभ घेतला आहे, त्या शेतकऱ्यांना ठरावीक वर्षे कर्ज न देण्याचा राष्ट्रीयीकृत बँकांचा नियम आहे. हा नियम जाचक असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. तसेच वारंवार सूचना देऊनही राष्ट्रीयीकृत बँका कर्ज वितरणाचे उद्दिष्ट साध्य करत नाहीत. या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे..Ken Agro Loan Repayment: केन ॲग्रोकडून जिल्हा बँकेला ३२.५० कोटींचा हप्ता जमा.खरिपाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी खते, बी-बियाणे खरेदी करण्याच्या तयारीत आहे. कृषी व्यवसाय हा अर्थव्यवस्थेचा कणा असला, तरी बँका सीबिल स्कोअर पाहून कर्ज नाकारत आहेत. मागील वर्षी राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत आपण बँकांना निर्देश देऊनही बँकांकडून सीबिल स्कोअरची मागणी केली जात आहे..Crop Loan Limit: पीककर्जाचे उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या चार बँकांना नोटिसा.तसेच तक्रार करूनही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांना कूलिंग पीरियडच्या नावाखाली राज्यातील काही बँकांचा कर्जाचा पुरवठा केला जात नाही. काही बँकांचा कूलिंग पीरियड ३ ते ७ वर्षे आहे. तर काही बँकांचा कायमस्वरूपी आहे. या कालावधीत शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा केला जात नाही. अशा शेतकऱ्यांना सुद्धा चालू वर्षात कूलिंग पीरियडची अट रद्द करून कृषी कर्जपुरवठा होणे आवश्यक आहे..बँकांचा कूलिंग कालावधीबँक ऑफ बडोदा तीन वर्षेबँक ऑफ इंडिया पाच वर्षेबँक ऑफ महाराष्ट्र कर्ज नाहीकॅनरा बँक तीन वर्षेसेंट्रल बँक ऑफ इंडिया कर्ज नाहीएचडीएफसी कर्ज नाहीआयसीआयसीआय कर्ज नाहीआयडीबीआय तीन वर्षेमहाराष्ट्र ग्रामीण बँक कर्ज नाहीपंजाब नॅशनल बँक कर्ज नाहीइको बँक पाच वर्षे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.