Kharif Season: धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ हवामानामुळे आणि अधूनमधून येणाऱ्या रिमझिम पावसाने खरीप पेरण्यांना गती मिळाली आहे. जिल्ह्यातील ५ लाख ५४ हजार १६० हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी आतापर्यंत २ लाख ५० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत; मात्र वरकरणी दिलासादायक दिसणाऱ्या या चित्राच्या मागे यंदा पावसाचे कमालीचे असमान वितरण, गेल्या वर्षीच्या तुलनेत बदललेले पर्जन्यमान आणि सुरवातीलाच पिकांवर आलेले किडीचे संकट यामुळे बळिराजा चिंतेत आहे..यंदा १ जून ते ९ जुलै या कालावधीत जिल्ह्यात एकूण १६६.७ मिमी सरासरी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात १५६.५ मिमी (९३.९ टक्के) पाऊस झाला आहे. आकडेवारीत हा पाऊस समाधानकारक वाटत असला तरी महिन्यांचा तुलनात्मक अभ्यास केला तर खरी परिस्थिती समोर येते..Kharif Sowing: सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी ४९ हजार हेक्टरवर .‘मे २०२५’चा विरोधाभास अन् यंदाचा असमान पाऊसगतवर्षी (२०२५) जूनमध्ये जरी कमी पाऊस (९८.६ मिमी) दिसला, तरी मे महिन्याच्या उत्तरार्धात सरासरी २५.९ मिमीच्या तुलनेत तब्बल २९८ मिमी (११५०.६ टक्के) इतका प्रचंड पाऊस झाला होता. त्यामुळे जमिनीत आधीच भरपूर ओलावा निर्माण झाला होता. यंदा परिस्थिती पूर्णपणे उलट राहिली. यंदा मॉन्सून वेळेवर आला तरी तो अत्यंत असमान आणि खंडित स्वरूपाचा आहे. भूम आणि परंडा तालुक्यांत शेतकऱ्यांनी जूनच्या सुरवातीलाच कमी ओलीवर पेरण्या उरकल्या आणि सुदैवाने नंतर रिमझिम पाऊस सुरू राहिल्याने तिथे दुबार पेरणीचा धोका टळला. तर उर्वरित जिल्ह्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्याने पेरण्यांना खऱ्या अर्थाने वेग आला..केवळ सोयाबीन नको, सोबत तुरीचे आंतरपीक घ्याजिल्ह्यात सध्या सरासरी ५० टक्के क्षेत्रावर खरीप पेरण्या पूर्ण झाल्या असून, पुढील काही दिवस पावसाचा खंड पडण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या अद्याप बाकी आहेत, त्यांनी मुख्य पीक असलेल्या सोयाबीनची पेरणी १५ जुलैपर्यंतच करावी. त्यानंतर मात्र एकट्या सोयाबीनची पेरणी न करता ‘सोयाबीन आणि तूर’ असे आंतरपीक घ्यावे. अशा आंतरपीक पद्धतीने ३१ जुलैपर्यंत पेरणी करता येऊ शकते. एवढेच नव्हे तर २०२३ मधील दुष्काळी परिस्थितीची आठवण करून देत यंदापेक्षा कमी पाऊस असतानाही आंतरपीक पद्धतीमुळे तुरीच्या पिकाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला होता, असे प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महादेव आसलकर यांनी सांगितले. .Kharif Sowing Update: अहिल्यानगर जिल्ह्यात खरिपाची ५० टक्के पेरणी.तसेच उडीद आणि मुगाच्या पेरणीची मुदत ३० जून रोजीच संपली असल्याने आता शेतकऱ्यांनी उडीद-मुगाची पेरणी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. सोयाबीनचे पीक १२ ते १५ दिवसांचा पावसाचा खंड सहन करू शकते आणि पाच-सहा दिवसांतून एखादा हलका पाऊस झाला तरी पिके चांगली येतील. मात्र, हा खंड अधिक वाढल्यास शेतकऱ्यांनी स्प्रिंकलरद्वारे (तुषार सिंचन) पिकांना संरक्षित पाणी देण्याची व्यवस्था आत्तापासूनच करून ठेवावी, असा मोलाचा सल्लाही आसलकर यांनी दिला..१८ जुलैपर्यंत खंडजिल्ह्यात पहिल्या टप्प्यात साधारण १८ जुलैपर्यंत पावसाचा खंड पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या काळात काही तुरळक ठिकाणी हलका ते अतिहलका पाऊस होऊ शकतो. पावसाच्या या खंडामुळे विशेषतः हलक्या जमिनीतील पिके अवघ्या १० दिवसांत ताणावर येऊ शकतात, तर भारी जमिनीतील पिके थोडा अधिक काळ तग धरू शकतील..जिल्ह्यातील प्रादेशिक विषमतायंदा जिल्ह्यामध्ये पावसाने मोठी भौगोलिक विषमता निर्माण केली आहे. यामुळे पिकांच्या अवस्थेतही फरक पडला आहे. उत्तर भागात (भूम, परंडा, वाशी, कळंब आणि धाराशिव उत्तर) खरिपासाठी समाधानकारक पाऊस झाल्याने पेरण्या लवकर झाल्या. येथील पिके सध्या वाढीच्या अवस्थेत आहेत. तर दक्षिण भागात (तुळजापूर, लोहारा, उमरगा आणि धाराशिव दक्षिण) आतापर्यंत पाऊस खूपच कमी झाला आहे. परिणामी, येथील पिके केवळ उगवणीच्या अवस्थेत असून अजूनही अनेक ठिकाणी पेरण्या सुरूच आहेत. ज्या भागात (विशेषतः कळंब आणि उत्तर भाग) पेरण्या लवकर झाल्या आणि पिके वाढीच्या अवस्थेत आहेत, तिथे आता कीडरोगांचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.