Farmer Crisis: धाराशिव जिल्ह्याच्या काही भागात मंगळवारी (ता.२१) सायंकाळी वादळी वारा व मेघ गर्जनेसह झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणावर आंबा पिकांचे नुकसान झाले. तर विठ्ठलवाडी (ता. धाराशिव) येथील बबन विठ्ठल लांडगे (वय ५२) यांचा वीज पडून मृत्यू झाला. सरडेवाडी (ता. तुळजापूर) येथील गणेश जयहिंद धुरगुडे यांची म्हैस, तर गोरेवाडी (ता. धाराशिव) येथील विशाल नाडे यांच्या गायीचा वीज पडून मृत्यू झाला..मंगळवारी सायंकाळी आकाशात काळे ढग जमा होऊन पावसाला सुरुवात झाली. काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली तर काही भागात गारांचा पाऊस झाला. धारूर (ता. तुळजापूर) शिवारात गारांचा पाऊस पडल्याने शेतशिवार पांढरे झाले..Unseasonal Rain Relief GR: अवकाळीग्रस्त ९ जिल्ह्यांतील ६६ हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा, ५३ कोटी ७३ लाख मदत मंजूर .कळंब तालुक्यातील वाठवडा व ढोराळा भागात जोरात पाऊस झाला. तुळजापूर तालुक्यात सरडेवाडी, धारुर, वडगाव काटी, धारशिव तालुक्यातील विठ्ठलवाडी, गोरेवाडी व अन्य भागांत पाऊस झाला. यामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. लातूर जिल्ह्यातही मुरुड परिसरात गाराचा पाऊस झाला. दरम्यान नुकसानीचा आढावा घेण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी दिली..Unseasonal Rain Impact: अवकाळी पावसाचा फटका; कडबा महागला.नागरिकांनी सतर्क राहावेजिल्ह्यात अनेक भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, प्रशासनाने पुढील काही दिवसांसाठी हवामानाचा अंदाज वर्तविला आहे. येत्या काही दिवसांत पुन्हा वादळ, जोरदार वारा, पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे..या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, ज्या भागात शेतीचे किंवा मालमत्तेचे नुकसान झाले आहे, त्या ठिकाणी पंचनामे करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. पुढील काही दिवस हवामान प्रतिकूल राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडणे टाळावे आणि हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.