Horticulture Subsidy Delay: लाखो रुपयांचे कर्ज काढून, रात्रंदिवस राबून फळबागा फुलवायच्या आणि पाण्याच्या एका थेंबासाठी उन्हाळ्यात टँकरच्या वाऱ्या करायच्या, हा आजवरचा अनुभव. त्यातच यंदा मॉन्सूनने अद्याप अपेक्षित हजेरी लावलेली नाही. हवामान विभागानेही यंदा कमी पर्जन्यमानाचा अंदाज वर्तविल्याने जिल्ह्यातील बळिराजा कमालीचा धास्तावला आहे..दुसरीकडे, शासनाच्या विविध फळबाग योजनांच्या अनुदानासाठी वर्षानुवर्षे प्रशासकीय उंबरठे झिजवावे लागत आहेत. नैसर्गिक दुष्काळजन्य स्थितीची भीती आणि शासनाच्या अनुदानाचाही दुष्काळ, अशा दुहेरी संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी अखेर यंदा नवीन फळबाग लागवडीला ‘ब्रेक’ लावल्याचे चित्र आहे. परिणामी, जिल्ह्याच्या फळबाग क्षेत्र वाढीवर मोठ्या मर्यादा येण्याची चिन्हे आहेत..Orchard Farmers Support: फळबाग उत्पादकांना आर्थिक आधार.जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत आंबा, डाळिंब, पेरू, सीताफळ आणि ड्रॅगन फ्रूट यासारख्या फळबागांकडे शेतकऱ्यांचा कल कमालीचा वाढला होता. पारंपरिक पिकांना फाटा देत शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची वाट धरली. मात्र, निसर्गाची अवकृपा आणि शासनाची अनास्था या दुहेरी संकटात सध्या फळबाग उत्पादक अडकला आहे..Farm Scheme: कृषी योजनांचा फुसका बार .भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, रोहयोअंतर्गत आंबा, पेरू, सीताफळ आदी बागा लावण्याकडे शेतकऱ्यांचा दरवर्षी मोठा कल असतो. यंदा मात्र चित्र पूर्णपणे उलटे आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बोटावर मोजण्याइतकी मोजकी उदाहरणे सोडली तर बहुतांश शेतकऱ्यांनी या लागवडींकडे सपशेल पाठ फिरविली आहे..कृषी विभागाकडे निधीचा खडखडाट!३,८०० शेतकरी अद्याप वंचित आहेत. यापूर्वीच्या हंगामात फळबाग लागवड करून त्यासाठी ठिबक सिंचन प्रणाली बसविलेल्या आणि महाडीबीटीवर अनुदानासाठी निवड झालेल्या जिल्ह्यातील सुमारे ३ हजार ८०० शेतकऱ्यांचेच अनुदान अद्याप वितरीत करण्यात आलेले नाही. त्यासाठी कृषी विभागाकडे निधी उपलब्ध नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.