Dharashiv News : जिल्ह्यातील एकूण २२६ प्रकल्पांपैकी २०४ प्रकल्पांत शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. सर्व प्रकल्पांत मिळून एकूण ९७ टक्के, तर उपयुक्त पाणीसाठा ९३.१८ टक्के झाला आहे. प्रकल्पांत अजूनही कमी-अधिक प्रमाणात पाण्याची आवक सुरूच आहे. .यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सीना कोळेगाव या मोठ्या प्रकल्पासह लघू, मध्यम प्रकल्प भरण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यातील असलेल्या एकूण २२६ प्रकल्पांची एकूण पाणीसाठा क्षमता ८६१.८६५ दशलक्ष घनमीटर आहे. .Water Storage : धाराशिव जिल्ह्यातील १८६ प्रकल्पांच्या सांडव्यांमुळे नद्या, ओढे तुडुंब.त्यापैकी प्रकल्पांत एकूण पाणीसाठा ८१३.९८६ दलघमी झालेला आहे. तर, उपयुक्त पाणीसाठा क्षमता ७२८.८०४ दलघमी असून सध्या प्रकल्पांत ६७९.१०१ दलघमी इतका पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे. दरम्यान, भरलेले २०४ प्रकल्प वगळता इतर सहा प्रकल्प भरत आले आहेत. त्यामध्ये ७५ ते ९९ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. याशिवाय आठ प्रकल्पांत ५० ते ७५ टक्क्यांदरम्यान उपयुक्त पाणीसाठा आहे..Dam Water Storage : नाशिकमधील सर्व धरणे तुडुंब .तसेच २५ ते ५० टक्के उपयुक्त पाणीसाठा असलेले सध्या चार प्रकल्प आहेत. २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असलेले आता केवळ तीन प्रकल्प उरले आहेत, तर जोत्याखाली एक प्रकल्प आहे. जिल्ह्यात सर्वांत मोठ्या सीना कोळेगाव प्रकल्पातील विसर्गात मोठी घट करण्यात आली आहे. .गुरुवारी (ता. २) २४ हजार ७०० क्युसेकने सुरू असलेला विसर्ग आता १० हजार २०० क्युसेकने घटवत १४ हजार ५०० क्युसेक करण्यात आला आहे. सीना नदीत हा विसर्ग सोडण्यात आलेला आहे. या प्रकल्पात १०० टक्के म्हणजे १५० दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.