New Delhi News: ‘पंतप्रधान धनधान्य कृषी योजना’ आणि ‘कडधान्य आत्मनिर्भर मिशन’ या दोन योजना देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांचे भाग्य बदलण्याचे काम करतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (ता. ११) या योजनांच्या अनावरणप्रसंगी बोलून दाखविला. या दोन्ही योजनांवर सरकार ३५ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च करणार आहे. .कृषी क्षेत्र विकासाच्या यात्रेचा प्रमुख हिस्सा असताना आधीच्या सरकारांनी शेतीला वाऱ्यावर सोडले होते. देशाच्या विकासासाठी कृषी व्यवस्थेमध्ये बदलाची आवश्यकता असून २०१४ नंतर याला सुरुवात झाली, असा दावा करून पंतप्रधान मोदी यांनी माजी कृषिमंत्री शरद पवार यांचा नामोल्लेख टाळताना काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातील कृषी धोरणांना लक्ष्य केले..धनधान्य कृषी योजना आणि कडधान्य उत्पादन वाढीसाठीच्या ‘कडधान्य आत्मनिर्भर मिशन’ या योजनांचे अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, राज्यमंत्री भगीरथ चौधरी उपस्थित होते. पूर्वीच्या सरकारांकडे कृषी क्षेत्रासाठी काहीही धोरणे नव्हती. शेतीशी संबंधित वेगवेगळे विभागही आपापल्या पद्धतीने काम करत होते. एकप्रकारे भारतीय कृषी व्यवस्था दुबळी होत गेली..PM DhanDhanaya Yojana: ‘पीएम धनधान्य कृषी योजने’ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.२१ व्या शतकातील भारताला वेगवान विकासासाठी आपल्या कृषी व्यवस्थेमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. याला २०१४ नंतर सुरवात झाली. कृषी क्षेत्राबाबत फारसे गंभीर न राहण्याची आधीच्या सरकारांची धोरणे बदलली, असे मोदी म्हणाले. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने (यूपीए) खतांवर १० वर्षांत ५ लाख कोटी रुपयांचे अनुदान दिले..तर भाजप- एनडीए सरकारने १० वर्षांत खतांवर १३ लाख कोटी रुपयांचे अनुदान दिले असल्याची आकडेवारी देताना मोदी म्हणाले, की काँग्रेस सरकारच्या काळात कृषी क्षेत्रावर एक वर्षात जेवढा खर्च होत होता, तेवढी रक्कम आपले सरकार पीएम किसान सन्मान योजनेचा एक हप्ता शेतकऱ्यांना देण्यासाठी खर्च करते, आतापर्यंत या योजनेतून ३.७५ लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात गेले आहेत, असा टोला त्यांनी लगावला..जीएसटीमध्ये सुधारणा झाल्याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना, पशुपालकांना झाला असल्याचा दावा मोदींनी केला. ते म्हणाले, की सणासुदीच्या काळात शेतकरी मोठ्या संख्येने ट्रॅक्टर खरेदी करत आहेत. एका ट्रॅक्टरवर काँग्रेसचे सरकार ७० हजार रुपयांचा कर घेत होते. जीएसटी सुधारणेनंतर ट्रॅक्टर ४० हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. शेतीच्या अन्य उपकरणांवरही जीएसटी मोठा प्रमाणात कमी झाला आहे. पीएम किसान धनधान्य कृषी योजनेबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले, की आकांक्षी जिल्हा योजना हा या धनधान्य योजनेचा आधार असून यात कृषी क्षेत्रात मागे पडलेल्या १०० जिल्ह्यांमध्ये कृषीचा विकास केला जाणार आहे..PM Kisan 21st Installment: किसान कॉल सेंटरला कॉल केल्यास पीएम किसानचे २ हजार रुपये २ मिनिटांत मिळतील?; दाव्यामागील सत्य काय?.१०० जिल्ह्यांची निवड अतिशय विचारपूर्वक करण्यात आली आहे. धनधान्य कृषी योजनेत सरकारच्या ३६ योजनांचा समावेश करण्यात आल्याचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी केला. त्यांनी सांगितले, की या योजनेत प्रत्येक जिल्ह्याला स्वतःच्या गरजेनुसार योजनेच्या आखणीत अंमलबजावणीत बदल करता येणार असून स्थानिक वातावरणासाठी, जमिनीसाठी अनुकूलता, पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन योजनेची आखणी करावी, अशा सूचना पंतप्रधानांनी केल्या..कडधान्य आत्मनिर्भरता मिशनबद्दल मोदी म्हणाले, की कडधान्य उत्पादनात देशाला आत्मनिर्भर बनवावे लागणार आहे. या योजनेसाठी ११ हजार कोटी रुपये देण्यात आले असून कडधान्यांचे विशेषतः तूर, उडीद, मसूर डाळीचे उत्पन्न वाढविण्याचे उद्दिष्ट असून उत्पादन क्षेत्र ३५ लाख हेक्टरपर्यंत देण्याचे आहे. २ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळेल..‘शेतकऱ्यांचे उत्पन्न मात्र वाढलेले नाही’या कार्यक्रमासाठी पुण्यातून सहभागी झालेले राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, ‘‘शेतीमध्ये उत्पादकता वाढली, मात्र शेतकऱ्यांचे उत्पन्न मात्र वाढलेले नाही. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी शेतीमालाची साठवणूक, प्रक्रिया आणि मूल्यवर्धन करणे गरजेचे आहे. याबरोबरच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विचार करून पिकाची आणि वाणाची निवड करणे गरजेचे आहे. सध्या राज्यात अतिवृष्टीचे सावट आहे. .शेतकऱ्यांनी येणाऱ्या पिकावर काही स्वप्ने बघितली होती. मात्र त्यांची स्वप्ने भंगली आहेत. राज्य सरकारने अतिवृष्टिग्रस्तांसाठी चांगले पॅकेज जाहीर केले आहे. यामध्ये आणखी काही गोष्टींचा समावेश करता येईल का? याचा देखील विचार सुरू आहे.’’ या वेळी कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक विनयकुमार आवटे, सुनील बोरकर, रफिक नायकवडी, दत्तात्रय गवसने, अंकुश माने आदी मान्यवर उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.