Local Issues: बुलडाणा तालुक्यातील सर्वांत मोठी बाजार पेठ असलेल्या धाड येथे गेल्या अनेक वर्षांपासून आठवडी बाजाराच्या जागेचा प्रश्न प्रलंबित आहे. या प्रश्नावर अखेर प्रशासनाने दखल घेत लेखी आश्वासन दिल्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे सुरू असलेले आंदोलन सोमवारी (ता.सहा) सायंकाळी स्थगित करण्यात आले..धाड येथील आठवडी बाजाराची समस्या सुमारे २८ वर्षांपासून कायम असून, बाजार भरत असलेल्या जागेची अत्यंत दयनीय अवस्था असल्याची बाब समोर आली आहे. संबंधित जागेचा आठवडाभर सार्वजनिक शौचालय म्हणून वापर होत असल्याने अस्वच्छता आणि दुर्गंधीच्या वातावरणात बाजार भरत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे..Pune Weekly Market: पुणे शहरात ४ ठिकाणी सुरू होणार आठवडी बाजार.या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देणे, बाजार परिसराचे नियमित निर्जंतुकीकरण करणे तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र अपेक्षित कार्यवाही न झाल्याने आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपोषणाला सुरुवात करण्यात आली. आंदोलनाला व्यापाऱ्यांनीही पाठिंबा देत आपली दुकाने धाड–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर लावली. त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला आणि प्रशासनाने तातडीने हालचाल सुरू केली..Weekly Market Closed: धाराशिवमधील १५ गावांत आज आठवडे बाजार बंद.आंदोलनाची दखल घेत बुलडाणा पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देत बाजारासाठी जागेचा प्रस्ताव लवकर तयार करण्याचे मान्य केले. तसेच, कायमस्वरूपी जागा उपलब्ध होईपर्यंत सध्याच्या जागेचे बाजाराच्या आधी निर्जंतुकीकरण करणे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. .त्यानंतर तहसीलदारांनीही उपोषणस्थळी भेट देत ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव प्राप्त होताच बाजारासाठी योग्य जागा उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन दिले. वैभवराजे मोहिते यांच्या नेतृत्वाखाली प्रहारचे उप तालुका प्रमुख गणेश जाधव, चिखली तालुका प्रमुख सुनील वाघ, विभाग प्रमुख सोनू वाघ, शरप्रमुख सचिन नेमाने, युवा शहर प्रमुख अजय शिंदे, दिलीप उबाळे, नीलेश चिंचोले, श्याम टाकसाळ, निलेश गुरव, दिलीप ठाकरे, ऋषी वाघ, राजू शिंदे, पवन बामदळे, वैभव कोप्पे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.