Nanded News: ग्रामीण भागातील सर्वात मोठी यात्रा समजल्या जाणाऱ्या तामसा येथील बारालिंग मंदिर परिसर गुरुवारी (ता. १५) पन्नास हजार भाविकांनी फुलून गेला. मराठवाड्यासह विदर्भ तसेच तेलंगणातून आलेल्या भाविकांनी भाजीभाकरी प्रसादाचा लाभ घेतला. .तामसा (ता. हदगाव) येथील बारालिंग मंदिराच्या भाजीभाकरी पंगतीत हजारो भाविकांनी महाप्रसाद घेण्यासाठी गर्दी केली होती. गुरुवारी (ता. १५) पहाटेपासून श्री अभिषेकानंतर दोन कढईमध्ये भाजी शिजविण्याला सुरुवात झाली..Ambikadevi Yatra: सांगोल्यात १९ ते २८ दरम्यान श्री अंबिकादेवी यात्रा.सकाळपासून शहराच्या विविध भागात महिला एकत्रित बसून श्रद्धेने चुलीवर भाकरी तयार करीत होत्या. दर्शन व प्रसादासाठी महिला व पुरुष भक्तांची सकाळपासून मोठी गर्दी होती. दुपारी महंत व्यंकटस्वामी महाराज, बिरागीदास महाराज, शिवचैतन्य महाराज यांच्या उपस्थितीत महापूजेनंतर प्रसाद वाटपाला सुरुवात झाली..Malegaon Yatra: ग्रामीण अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू ठरतेय माळेगाव यात्रा.भोकर शहरातील सदभक्तांनी पायी दिंडीद्वारे बारालिंग मंदिरापर्यंत भजन गात वाहनभर भाकरी येथे पोचती केल्या. शहरासह अनेक खेड्यातून भाविक येथे भाकरी मोठ्या संख्येने जमा करीत होते..दुपारी मंदिर परिसर भाविकांनी फुलून वातावरण आध्यात्मिक बनले होते. भाजी व भाकरीचा सुगंध दरवळत होता. परिसरात अस्सल मराठमोळे ग्रामीण वातावरण होते. मंदिराकडे जाणारा रस्ता व पायवाटा भाविकांनी गजबजल्या होत्या. हाती पडलेला प्रसाद खाताना भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान बघायला मिळाले. मंदिर परिसरातील शेतात अनेक कुटुंबांनी वनभोजनाचा आनंद घेतला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.