Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Mumbai Mayor Statement: 'देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल', या उद्धव ठाकरेंच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'देवाच्या मनात म्हणजे माझ्या की वरच्या देवाच्या?...कारण मला देवा म्हणतात. पण वरच्या देवाने ठरवले आहे की महायुतीचा महापौर करायचा आहे. त्यामुळे आमचाच होईल', असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते..मुंबई महापालिकेत अडीच-अडीच वर्षे महापौरपद वाटून देण्याची मागणी शिंदे सेनेकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस यांनी म्हटले की, शिंदे आणि आम्ही बसून ठरवू. काही वाद येणार नाही. आम्ही दोन्ही पक्ष छानपैकी मुंबई चालवून दाखवू. त्यांच्या काही जागा कमी मताने गेल्या आहेत. ते पहिल्यांदाच अशा पद्धतीने निवडणूक लढवत होते. त्यामानाने त्यांना चांगले यश मिळाले आहे. अपेक्षा यापेक्षा जास्त होती. पण काही थोड्या मतांनी त्यांच्या जागा गेल्या आहेत..BJP Mahayuti Victory : ...हा तर विक्रमी जनादेश, महाराष्ट्राचा पंतप्रधान मोदींवर विश्वास- फडणवीस.मुंबईत महायुतीला ११९ जागा मिळाल्या असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. आम्ही १४ जागा कमी मताने हारलो. पण आम्हाला पूर्ण बहुमत मिळाले आहे. गेल्या तीन निवडणुकांमध्ये एवढ्या जागा एकत्रित शिवसेनेला मिळाल्या नव्हत्या. आम्ही त्यांचे रेकॉर्ड मोडले, असे त्यांनी नमूद केले. मराठी जिंकली, मुंबईकर जिंकला, महाराष्ट्र जिंकला! आणि या सर्वांसोबत, आपला हिंदुत्व आणि विकासाचा अजेंडा जिंकला...धन्यवाद मुंबई! अशी पोस्ट त्यांनी मुंबईतील विजयावर केली होती. .Uddhav Thackeray: 'देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल'; ठाकरेंचे सूचक विधान.'पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त यश'पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचंड मोठा विजय मिळवून दिल्याबद्दलही त्यांनी जनतेचे आभार मानले. ज्या प्रकारचा विजय पुणे, पिंपरी- चिंचवडने दिला आहे; त्या विजयाचा आनंद तर आहेच. त्याहीपेक्षा जबाबदारीचे भान होत आहे. इतका मोठा विजय हा एकप्रकारे जनतेने दाखवलेला विश्वास आहे. या विश्वासाला पात्र होण्याकरिता आम्हाला जास्त मेहनत करावी लागले. आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले. याचाच अर्थ पुणेकरांनी पंतप्रधान मोदींना, भाजपला स्वीकारले, असे फडणवीस म्हणाले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.