Amaravati News : ग्रामीण भागातील विकासाचे केंद्र असलेल्या ग्रामपंचायतींना गेल्या सहा महिन्यांपासून पंधराव्या वित्त आयोगाचा निधी नसल्यामुळे गाव खेड्यातील विकास रखडला आहे. त्यामुळे शासनाने निधी वितरित करावा, अशी मागणी तिवसा तालुक्यातील एकवीस ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी जिल्हा परिषद सीइओंकडे केली आहे..पंधराव्या वित्त आयोगाचा निधी ग्रामविकास विभागामार्फत वितरित केला जातो. ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छता, पाणीपुरवठा, वीजसमस्या यासह इतर मूलभूत सुविधा ग्रामस्थांना मिळाव्या यासाठी पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून विविध विकास कामे केली जातात, परंतु गेल्या सहा महिन्यांपासून तिवसा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या एकवीस ग्रामपंचायतीना हा निधी मिळाला नाही. .Rural Development: ग्रामविकास, बचत गटाला चालना देणारी ‘वनश्री’.त्यामुळे या सर्व ग्रामपंचायतींचा विकास खोळंबला असून भर पावसाच्या दिवसात स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा या सोबतच इतर समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे तातडीने ग्रामपंचायतींना निधी वितरित करावा, अशी मागणी होत आहे..Rural Development: शेतकऱ्यांची स्थिती सुधारली तरच भारत प्रगत होईल.दोन टप्प्यांत मिळतो निधीतालुक्यात ४५ ग्रामपंचायत असून यामध्ये २४ ग्रामपंचायतींना २०२४-२५ या आर्थिक वर्षातील पंधराव्या वित्त आयोगाचा निधी देण्यात आला आहे. उर्वरित २१ ग्रामपंचायतीचे उशिरा ऑडिट व काही त्रुटीमुळे निधी प्राप्त झाला नाही. मार्च आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यांमध्ये ग्रामपंचायतींना हा निधी दिला जातो..निधी प्राप्त होण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी या बाबतचे निकष पूर्ण केले आहेत. लवकरच २१ ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगाचा निधी प्राप्त होईल.- अभिषेक कासोदे, गटविकास अधिकारी.दरवर्षी हा निधी जमा होतो. परंतु या वर्षी ऑडिट रिपोर्ट ऑनलाइन न होण्याच्या कारणास्तव निधी प्राप्त होण्यास विलंब झाल्याचे सांगण्यात येते. आम्ही सातत्याने पत्रव्यवहार करीत आहोत. शासनाने दिलेले निकष पूर्ण करूनही निधी मिळत नाही. मग आम्ही ग्रामपंचायत स्तरावरील कामे करायची तरी कशी?- दर्शना मारबदे (पिढेकर), सरपंच, तळेगाव ठाकूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.