Devala News: देवळा तालुक्यातील फुलेमाळवाडी गावातील प्लॅस्टिक कचऱ्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासह गाव प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी फुलेमाळवाडी ग्रामपंचायतीने एक आदर्श पाऊल उचलले आहे. यासाठी टाकाऊ पीव्हीसी पाइपचा वापर करून ‘प्लॅस्टिक घर’ नावाचा कचराडबा तयार केला असून, त्याचे घरोघरी वाटप करण्यात आले आहे. या कल्पक मोहिमेमुळे गावात स्वच्छतेबाबत मोठी जनजागृती होत आहे..‘प्लॅस्टिक संकलन’ या फुलेमाळवाडी गावच्या अभियानाची दखल नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांनी घेतली आहे. ते याबाबत बोलताना म्हणाले, ‘‘शेतीकामातून उरलेले पाइपचे तुकडे एरवी शेताच्या बांधावर किंवा घराबाहेर अडगळ म्हणून पडून राहतात. मात्र याच अडगळीचा वापर करून फुलेमाळवाडीने गावचा चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात केली आहे. कल्पकता आणि ग्रामस्थांच्या हातातील कौशल्यातून साकारलेली ही यंत्रणा ‘जुनाट’ प्लॅस्टिक प्रदूषणावर उपाय शोधणारी ठरली आहे.’’.Waste Management: गुंतागुंत: कचऱ्याची आणि आपल्या जगण्याची!.गावातील तरुणांनी एकत्र येऊन ही मोहीम सुरू केली. या कचराडब्यामुळे प्लॅस्टिक कचरा आता इतर ओल्या कचऱ्यात मिसळणार नाही, त्याचे संकलन करणे अत्यंत सोपे झाले आहे. गावचा परिसर स्वच्छ राहावा आणि भविष्यातील पर्यावरणीय धोके टाळता यावेत, यासाठी ग्रामपंचायतीने घेतलेल्या पुढाकारात महिला आणि तरुणांनी सहभाग नोंदवला आहे..Plastic Waste Management : नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यात प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन युनिट....अशा प्रकारे होते संकलनहे डस्टबिन्स आकाराने दंडगोलाकार असून त्यांना वरच्या बाजूला हँडल बसवले आहे. घरातील चॉकलेटचे कागद, दुधाच्या पिशव्या ‘प्लॅस्टिक घरा’त टाकतात. हे डस्टबिन वजनाला हलके असल्याने ते रिकामे करून पुन्हा वापरणे अत्यंत सोपे आहे. या कामी गावकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद अतिशय उत्साहवर्धक आहे, असे सरपंच लंकेश बागूल यांनी सांगितले..‘वेस्ट टू बेस्ट’चा आदर्श वस्तुपाठशेतीकामात उरलेले पीव्हीसी पाइप सामान्यतः अडगळीत पडलेले असतात किंवा जाळून पर्यावरणाची हानी केली जाते. मात्र फुलेमाळवाडीने याच ‘टाकाऊ’ साहित्याला ‘टिकाऊ’ डस्टबिनचे रूप देऊन ‘वेस्ट टू बेस्ट’चा संदेश दिला आहे. यामुळे गावातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सुटण्यासोबतच पर्यावरणाचे रक्षणही होत आहे. शासकीय निधीची वाट न पाहता लोकसहभागातून काय साध्य होऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.