Amravati News: विदर्भातील संत्रा बागायतीत उत्पादन घट, फळगळ आणि दर्जाहानी यामागे कीड-रोगांपेक्षा व्यवस्थापनातील मूलभूत चुका अधिक जबाबदार असल्याचे प्रतिपादन प्रयोगशील शेतकरी डॉ. प्रवीण बेलखेडे यांनी केले. .वाघोली येथील त्यांच्या शेतावर रविवारी आयोजित निशुल्क संत्रा व्यवस्थापन कार्यशाळेत राज्यभरातून आलेल्या संत्रा बागायतदारांना मार्गदर्शन करताना त्यांनी संत्रा पिकातील मुळांची रचना, पाणी-माती संतुलन आणि मशागत यातील वैज्ञानिक बाबी स्पष्ट केल्या. डॉ. बेलखेडे यांनी सांगितले, की संत्रा झाडांची तंतुमय मुळे जमिनीच्या वरच्या थरात पसरलेली असतात. हीच मुळे झाडाला पाणी व अन्नद्रव्ये पुरवण्याचे काम करतात..Orange Orchard : बुरशीजन्य देठसुकी, फांदी मर, फळगळ व्यवस्थापन.बागेत ट्रॅक्टरने मशागत करणे, कोळपणी करणे किंवा आंतरपीक घेणे यामुळे ही नाजूक मुळे तुटतात. परिणामी झाड ताणाखाली जाते, अन्नद्रव्यांचे शोषण कमी होते आणि त्याचा थेट परिणाम फुलगळ, फळगळ व उत्पादन घट यावर दिसून येतो. त्यामुळे संत्रा बागायतीत ‘शून्य मशागत’ ही केवळ पर्याय नसून गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. बागेतील छाटणीच्या तांत्रिक बाबीकडे दुर्लक्ष केल्यास प्रकाशसंश्लेषण क्षमता कमी होते, असेही त्यांनी सांगितले..झाडाच्या मध्यभागी असलेल्या दाट व अनावश्यक फांद्या काढून टाकल्यास सूर्यप्रकाश आतपर्यंत पोहोचतो, त्यामुळे पाने अधिक कार्यक्षमतेने प्रकाशसंश्लेषण करतात आणि त्याचा थेट फायदा फळांचा आकार, रंग आणि रसाळपणा यावर होतो. छाटणी म्हणजे झाडाला जखमी करणे नसून त्याच्या जैविक क्षमतेला योग्य दिशा देणे आहे, असे त्यांनी नमूद केले. संत्रा बाग व्यवस्थापनात पाण्याचा सामू म्हणजे पीएच अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याकडेही डॉ. बेलखेडे यांनी लक्ष वेधले..Orange Orchard : संत्रा फळबागांना विदेशी गुंतवणूकदारांची भेट.शेणखत सूक्ष्मजीवांचे खाद्यशेणखताबाबतही त्यांनी एक महत्त्वाची तांत्रिक बाब मांडली. शेणखत हे झाडाचे थेट खाद्य नसून जमिनीतील सूक्ष्मजीवांचे खाद्य आहे. हे जीवाणू शेणखतातील सेंद्रिय घटकांचे विघटन करून झाडाला अन्नद्रव्ये उपलब्ध करून देतात. त्यामुळे अतीप्रक्रिया केलेले खत न वापरता चांगले कुजलेले शेणखत थेट जमिनीत वापरणे अधिक परिणामकारक ठरते, असे त्यांनी सांगितले. अनेक शेतकऱ्यांचा असा समज असतो की फवारणीतील घटक झाडात साठवले जातात व त्यातून फळांचा दर्जा सुधारतो, मात्र प्रत्यक्षात बहुतांश फवारण्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. .रोग-किड व अन्नद्रव्यांची गरज माती व पान परीक्षणावर आधारित ठरवूनच फवारण्या करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माजी कृषी अधिकारी पी. पी. शेळके यांनी स्पेनमधील संत्रा बागायतीचा अनुभव सांगताना तेथील शून्य मशागत, काटेकोर पाणी-पीएच नियंत्रण आणि दर्जाभिमुख उत्पादन पद्धती विदर्भातील संत्रा बागायतदारांनी अंगीकाराव्यात, असे मत व्यक्त केले. माजी कृषी अधिकारी रवींद्र इंगोले, प्रमोद राऊत ठाणेदार ईश्वर वर्गे, सचिन लुले, रामनाथ सांबरे यांची यावेळी उपस्थिती होती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.