Solapur News: सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराला आता दोन महिने उलटले. दिवाळीही संपून देव-दिवाळीही झाली, तरी प्रशासनाने पोर्टलवर अपलोड केलेल्या १ लाख १२ हजार ०८१ बाधित शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळाली नाही. .पैसे का मिळाले नाहीत, याबाबत प्रशासनाकडून विविध कारणे सांगितली जात आहेत. मात्र प्रत्यक्षात दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही जमा झालेला नाही. हीच समस्या सर्व बाधित शेतकऱ्यांना भेडसावत आहे.सप्टेंबर अखेरीस झालेली अतिवृष्टी व महापुरातील बाधितांना दिवाळीपूर्वी व दिवाळीमध्ये मदतीचे पैसे देण्यास. Ativurshti Anudan: अतिवृष्टीग्रस्तांना रब्बी पिकांसाठीचं अनुदान वाटपासाठी हालचालीला वेग| Agrowon.सुरवात झाली. जिल्ह्यातील ४ लाख ८० हजार ७८० शेतकऱ्यांना आतापर्यंत ५८४ कोटी रुपये मिळाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. मदत वाटपाची प्रक्रिया नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण होईल, अशीच अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात दोन महिन्यानंतरही जवळपास एक लाख शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. बाधित शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसणे, फार्मर आयडी काढला पण तहसीलदारांकडे प्रलंबित राहिला आहे, काही.शेतकऱ्यांचे आधार डुप्लिकेशन झाले, ई-केवायसी राहिली, खाते नंबर चुकला,पंचनाम्यातील नाव वेगळे व फार्मर आयडीतील नाव वेगळे यासह अनेक कारणे कोतवाल, तलाठी, मंडल अधिकारी वतहसीलदार सांगत आहेत. त्यामुळे बाधित शेतकरी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यातच मेटाकुटीला आला आहे..Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत आठ निर्णय; अतिवृष्टीग्रस्तांना २ हजार २१५ कोटींचा निधी आत्तापर्यंत मंजूर.आकडे बोलतात...नावे अपलोड झालेले शेतकरी५ लाख ९२ हजार ८६१नावे अपलोड झाल्याची रक्कम.७२४ कोटी रुपयेभरपाई मिळालेले शेतकरी४ लाख ८० हजार ७८०मिळालेली रक्कम५८४ कोटी रुपये.मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत जवळपास ७० हजार शेतकऱ्यांची आम्ही ई-केवायसी केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांसाठी महसूल प्रशासनाने शिबिर सुरू केले आहेत. ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी नाही, त्यांनी या शिबिरामध्ये जाऊन ई-केवायसी करून घ्यावी. त्यानंतर सात ते आठ दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात भरपाईची रक्कम जमा होईल.- कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.