Mumbai News: उपराजधानी नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या समारोपाला राज्य सरकारने एक पाऊल मागे येत शक्तिपीठ महामार्गाचे आरेखन बदलण्याची घोषणा केली असली तरी या महामार्गाला विरोध कायम आहे. हा महामार्ग सोलापुरातून सातारा, सांगली आणि पुढे चंदगडमार्गे पत्रादेवीला जाईल, असे सांगितले जात असले तरी कोल्हापुरातून हा मार्ग चंदगडला कसा जाणार याची स्पष्टता राजपत्रातच होणार आहे. .१२ जिल्ह्यांमधून २८ हजार एकरांतून जाणारा पवनार ते पत्रादेवी या शक्तिपीठ महामार्गाला राज्यभरातून प्रचंड विरोध होत आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महामार्ग नागपूर ते रत्नागिरी महामार्गाला समांतर जात असल्याचे कारण देत आरेखन बदलल्याचे सांगितले आहे. या आरेखनात राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची सोय पाहिली गेल्याचेही आरोप करण्यात येत आहेत..मात्र, राज्य सरकार ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. यवतामाळपासून कोल्हापूरपर्यंत या महामार्गाला प्रचंड विरोध होत आहे. कोल्हापुरातून जाणारा महामार्ग विधानसभा निवडणुकीआधी रद्द केल्याचे राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले. या मार्गाच्या भूसंपादनासाठी १२ हजार ८७८ कोटी रुपये, तर संभाव्य व्याजापोटी ८ हजार ७८७ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे..Shaktipeeth Expressway: 'शक्तिपीठ'चा मार्ग बदलला, सोलापूर, सांगली, चंदगड...मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत दिली सविस्तर माहिती.या महामार्गात येणाऱ्या १२ जिल्ह्यांतील ३७० गावांपैकी ३०० गावांतील जमिनींच्या मोजणीसाठी भूमी अभिलेख विभागाकडे फी भरण्यात आली आहे. १११ गावांमधील जमिनीच्या मोजणीसाठी भूमी अभिलेख विभागाकडून तारखा निश्चित केल्या होत्या..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाला विरोध नसल्याचे सांगितले तरी शेतकरी संघटनांसह राज्यभरातील विविध संघटना या महामार्गाविरोधात आहेत. सांगलीतून पुढे चंदगडमार्गे हा महामार्ग नेण्यासाठी कर्नाटकची सीमा किंवा कागल, आजरामार्गे जावे लागते. त्यामुळे कोल्हापुरातून हा रस्ता कसा नेणार याची अद्याप स्पष्टता नाही. कोल्हापुरातील विरोधामुळे सरकार एक पाऊल मागे आले असले तरी आता शेतकऱ्यांचे राजपत्राकडे लक्ष लागले आहे..Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’चे आरेखन सोलापूरपासून बदलले.कर्नाटक सरकारची परवानगी आहे का?सोलापूरपासून पुढे सातारा, सांगली आणि कोल्हापूरमार्गे चंदगड असा मार्ग असेल तर कोल्हापुरातील विरोधापोटीच हा मार्ग रद्द करण्यात आला होता. दुसरा मार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ला जोडल्यास तो कर्नाटकातून जातो. संकेश्वर ते बांदा हा प्रशस्त महामार्ग तयार झाला आहे. त्याला जोडून गडहिंग्लज किंवा आजऱ्यातून चंदगडला जावे लागेल. हा महामार्ग म्हणजे उलटा प्रवास आहे. त्यामुळे सरकार नेमका काय निर्णय घेते याकडे आता लक्ष लागले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ला हा महामार्ग जोडायचा असेल तर तशी परवानगी आहे का? की तुकड्या तुकड्यांनी हा महामार्ग केला जाणार याकडे लक्ष लागले आहे..आम्ही राजपत्राची वाट पाहत आहोत. मराठवाड्यातून हा महामार्ग रद्द झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आरेखन बदलले तरी ते आम्ही स्वीकारणार नाही. गावांचा स्पष्ट उल्लेख आल्यानंतर आम्ही पुढील आंदोलनाची दिशा ठरवू. तरीही या महामार्गाला जमीन द्यायची नाही हे आमचे पक्के ठरले आहे. गोविंद घाटोळ, परभणी.राज्य सरकारने ग्रामीण भागातील रस्ते आधी दुरुस्त करावेत. त्यानंतर महामार्गाची स्वप्ने पाहावीत. महामार्ग बांधाल पण तिथंवर कसे पोहोचायचे हे सरकारने सांगावे. ग्रामविकासासाठी आमदारांना द्यायला तुमच्याकडे निधी नाही आणि तुम्ही शक्तिपीठ करण्याच्या घोषणा कशा करता? कैलास पाटील, आमदार, धाराशीव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.