एकनाथ शिंदे काय म्हणाले?महायुती सरकार शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाहीशेतकरी बंधू- भगिनींनो तुम्ही धीर सोडू नकातुमचे जीवन जे उद्ध्वस्त झालंय त्याला उभारी देण्याचे काम शिवसेना करणार.Eknath Shinde Dasra Melava Speech : पूरग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत दिली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (दि. २) दसरा मेळाव्यात बोलताना दिले. शिवसेनेचा दसरा मेळावा गोरेगावच्या नेस्को मैदानावर पार पडला. .''महापुरामुळे बळीराजा कोलमडून गेला आहे. पण शेतकरी बंधू- भगिनींनो तुम्ही धीर सोडू नका. तुम्ही टोकाचे पाऊल उचलू नका. तुमचे भाऊ इकडे आहेत. तुमचे जीवन जे उद्ध्वस्त झालंय त्याला उभारी देण्याचे काम शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना, महायुती सरकार शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. मीदेखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्याचे कष्ट, वेदना, दुःख मला माहीत आहेत. शेतकऱ्यांना मदत दिवाळीपूर्वी दिली जाईल, हा एकनाथ शिंदेंचा शब्द आहे'', अशी ग्वाही त्यांनी दिली..आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या मागे उभे आहोत. सरकार त्यांच्या मागे आहे. पूर्वी दुष्काळ पडला, पूर आला त्या त्यावेळेस अन्नधान्य, जीवनाश्यक वस्तू, जनावरांना चारा देण्याचे काम शिवसेनेने केले. आताही कोणत्याही अटी, शर्ती बाजूला ठेवून मंत्रिमंडळानं मुख्यमंत्र्यांसह आम्ही ठरवलंय, बळीराजाला मदतीची हात, आधार दिला पाहिजे. संकट मोठे आहे. लोकं आम्हाला सांगत होती, अनेक वर्षांत आम्ही इतका पाऊस पाहिला नाही. सगळं उद्ध्वस्त झालंय. अशा परिस्थितीत आपण शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे, असे शिंदे म्हणाले..Farmers Death: धक्कादायक वास्तव! भारतात दर तासाला एक शेतकरी जीवन संपवतोय, सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात.'जिथे संकट तिथे हा एकनाथ शिंदे प्रकट' हे समीकरण आहे. यावेळीही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे दुःख पाहिले असल्याचे त्यांनी नमूद केले..राज्यातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना त्यांचा मुला-मुलींची लग्न लावून देण्यास अडचणी आल्यास ही जबाबदारी शिवसेना घेईल, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले..Seena River Flood : पूरग्रस्त गावातील पशुधनाला चारा वाटप.यंदाचा दसरा पूरग्रस्तांचे अश्रू पुसून साजरा करण्याचे आवाहन आपण राज्यभरातील शिवसैनिकांना केले होते. त्यामुळे मेळाव्याला सुरुवात करण्यापूर्वी शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्तांकरिता पाठवण्यात येणाऱ्या मदतीच्या ट्रक्सना भगवा झेंडा ते दाखवून अतिवृष्टीग्रस्त भागाकडे रवाना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले..'तुम्ही पक्षप्रमुख नव्हे तुम्ही 'कट' प्रमुख', उद्धव ठाकरेंवर हल्लाबोलयावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ''पक्षाच्या कार्यकर्त्यांना संपवण्याचे काम तुम्ही केले. त्यामुळे तुम्ही पक्षप्रमुख नव्हे तुम्ही 'कट' प्रमुख आहात. त्यामुळे आगामी निवडणुकीनंतर तुमची सावलीदेखील तुमच्यासोबत राहील की नाही सांगता येत नाही, अशा आरोप त्यांनी केला. यावेळी माजी आमदार राजन तेली आणि माजी आमदार अण्णासाहेब माने यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.