Chhatrapati Sambhajinagar: शासनामार्फत मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून हमीभावाने मका खरेदीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया ठप्प आहे. त्यामुळे मका उत्पादक अडचणीत आले असून, तत्काळ हमीभावाने मका खरेदी सुरू करून खरेदी केंद्र संख्या व लक्ष्यांक वाढवावा, अशी मागणी खासदार कल्याण काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. .या संदर्भात श्री. काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवारी (ता.२४) निवेदन दिले. निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात या वर्षी सुमारे २ लाख ६३ हजार हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची पेरणी झाली. शासन नियमांनुसार हेक्टरी २७.५० क्विंटल उत्पादन गृहीत धरल्यास जिल्ह्यातील एकूण अपेक्षित उत्पादन सुमारे ७२ लाख ३२ हजार ५०० क्विंटल इतके होते..Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?.एवढ्या मोठ्या उत्पादनाच्या तुलनेत जिल्ह्यासाठी मागविण्यात आलेला एकूण लक्ष्यांक केवळ १ लाख क्विंटल इतकाच होता. त्यापैकी टप्प्याटप्प्याने प्राप्त झालेला लक्ष्यांक फक्त ३४ हजार क्विंटल आहे. प्रत्यक्षात आजपर्यंत केवळ २१,७२९ क्विंटल मका खरेदी करण्यात आलेला आहे. मका विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ९ हजार ६३४ इतकी असताना प्रत्यक्ष खरेदी झालेल्या नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या केवळ ७२९ इतकी आहे..या परिस्थितीचा गैरफायदा घेत खासगी व्यापारी १,६०० ते १,७०० रुपये प्रति क्विंटल दराने शेतकऱ्यांकडून मका खरेदी करत आहेत. शासनाचा हमीभाव २४०० रुपये प्रति क्विंटल आहे. यामुळे प्रति क्विंटलमागे सुमारे ६०० ते ७०० रुपये नुकसान होत आहे.निवेदन देताना छत्रपती संभाजीनगर काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, तसेच सरचिटणीस राहुल सावंत, दत्तू ठोंबरे, जगदीश पाटील डवले, गणेश पाटील उपस्थित होते..Subsidy Delay: दोन हजार कोटींचे अनुदान रखडविले.२६ हजार क्विंटल खरेदीमागणीच्या तुलनेत केवळ ३४ हजार क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट मिळाले होते. त्यापैकी आतापर्यंत २६ हजार क्विंटल मका खरेदी करण्यात आला असून ज्या केंद्रावर उद्दिष्ट पूर्ती झाली नाही त्या ठिकाणी खरेदी सुरू असल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनने दिली.....या केल्या मागण्यामका खरेदी नियमित व अखंडित सुरू करण्यात यावी.उत्पादनाच्या प्रमाणात मका खरेदीचा लक्ष्याक वाढवा.मका खरेदी केंद्रांची संख्या वाढवा. खासगी व्यापाऱ्यांकडून होणारी दरकपात व शेतकऱ्यांची लूट रोखण्यासाठी नियंत्रण यंत्रणा सक्रिय करा.शेतकऱ्यांना शासनाकडून अधिकृत निवेदनाद्वारे आश्वस्त करण्यात यावे, जेणेकरून खरेदी प्रक्रिया सुरू झाल्यानंतरच ते आपला मका विक्रीसाठी आणतील व त्यांची आर्थिक हानी टळेल..शेतकरी वर्षभर कष्ट करून उत्पादन घेतो. कर्ज, बियाणे, खते, मजुरी व इतर खर्च करूनही शेवटी त्याला हमीभावापेक्षा कमी दराने माल विकावा लागत असल्यास त्याच्या आर्थिक स्थितीवर व मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. शासनाच्या हमीभाव योजनेचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा.- खासदार डॉ. कल्याण काळे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.