Nashik Agriculture News: नाशिक जिल्ह्यात ३० मार्च रोजी झालेल्या जोरदार पूर्वमोसमी पाऊस आणि गारपिटीने शेतीचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडून टाकले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या प्राथमिक अहवालानुसार, जिल्ह्यात ७ तालुक्यांमध्ये १५४ गावांना या अस्मानी संकटाचा फटका बसला आहे. यात ३० हजार ५३ शेतकऱ्यांच्या सोन्यासारखे पीक मातीमोल झाले आहे. .अहवालानुसार २२ हजार ०२७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, यात सर्वाधिक नुकसान कांदा, डाळिंब व गहू पिकांचे झाले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान बागलाण, मालेगाव, सिन्नर, निफाड तालुक्यांत आहे. याशिवाय चांदवड, देवळा, नाशिकसह पश्चिम भागात देखील पावसाचा फटका बसला आहे. रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा पिकाला बसला आहे. कसमादे भागात अनेक ठिकाणी काढणीला आलेला कांदा पाण्याखाली भिजला..Hailstorm Damage: गारपीट-अवकाळीमध्ये ऊस पिकाची काळजी कशी घ्यावी?.तसेच गारपिटीच्या तडाख्यात सापडल्याने तो शेतातच सडण्याची भीती निर्माण झाली आहे. पाठोपाठ गहू भुईसपाट झाला आहे. पावसामुळे गव्हाची काढणीपश्चात प्रतवारी घसरणार असल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. याशिवाय मका, भाजीपाला, टोमॅटोचे नुकसान झाले असून, उन्हाळी हंगामाच्या नियोजनावर पाणी फिरले आहे..फळबागांना मोठा फटकाबागलाण आणि मालेगाव तालुक्यांत अनुक्रमे १५६० व २२८ हेक्टर क्षेत्रावरील डाळिंबाच्या बागांचे नुकसान आहे. यासह सिन्नर, चांदवड व निफाड तालुक्यांत नुकसान झाले आहे. बागलाण तालुक्यात पूर्वहंगामी द्राक्ष बागांमध्ये छाटणी झालेल्या बागांचे नुकसान आहे. तर निफाड तालुक्यात काही ठिकाणी काढणी सुरू असलेल्या बागांमध्ये नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यासह पेरू आणि आंब्याच्या बागांनाही फटका बसला आहे. गारपिटीमुळे फळांना मार बसल्याने फळे खराब झाली आहे. यासह डाग पडल्याने आणि झाडांचे नुकसान झाल्याने उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे..Onion Crop Damage: ढगाळ हवामानाचा कांदा पिकाला फटका.सटाणा आणि मालेगावमध्ये सर्वाधिक हाहाकारबागलाण तालुक्यात सर्वाधिक भीषण परिस्थिती आहे. येथील १९५५० शेतकऱ्यांचे १४८०९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्याखालोखाल मालेगाव तालुक्यात ४९८२ हेक्टरवर निसर्गाचा कोप पाहायला मिळाला. निफाड, सिन्नर आणि चांदवड या तालुक्यांमध्येही पावसाने मोठी हानी केली आहे. प्राथमिक अहवालातील ही आकडेवारी पाहता, प्रत्यक्ष नुकसानीची तीव्रता यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही..लोकप्रतिनिधी बांधावर गेले आहेत तर पंचनामे सुद्धा सुरू होतील. मात्र गेल्या वर्षभरापासून लढणारा शेतकरी पुन्हा अस्मानीच्या तडाख्यात सापडला आहे. त्याला पाठबळ देण्यासाठी शासनाने पुढे यावे, तत्काळ सरसकट पंचनामे करून मदत जाहीर करावी.वाल्मीक सांगळे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, रयत क्रांती संघटना.पीकनिहाय नुकसानपीक बाधित क्षेत्र (हेक्टर)कांदा १८,१९१.७०गहू १,३३५.५०मका २६७.००भाजीपाला व इतर १९९.५०कांदा रोपवाटिका १०.००डाळिंब १,८५८.७०द्राक्षे १३६.००पेरू ५.५०आंबा १.८०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.