Nashik News : खरीप हंगाम २०२३-२४ मधील अनुभव पाहता प्रशासकीय त्रुटींमुळे नांदगाव तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त ४० तालुक्यात होऊ शकला नव्हता. परिणामतः शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीपासून वंचित रहावे लागले. चालू हंगामात तालुका प्रशासनाने ग्राम पीक पैसेवारी समितीची काटेकोर अंमलबजावणी करावी. .स्थापन केलेल्या समितीच्या सर्व सदस्यांची नावे ग्राम पंचायत/तलाठी कार्यालयाच्या जाहिरात फलकावर लावण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नांदगाव तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी केली आहे. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट किंवा दुष्काळ यामुळे होणारे पिकांचे नुकसान बघता जमीन महसूल थांबविण्यासाठी, कमी अथवा रद्द करण्यासाठी पिकांची आणेवारी महत्त्वाची ठरते. .Kharif Sowing 2025 : कापूस, सोयाबीन, तुरीकडे शेतकऱ्यांची पाठ; मक्याला मात्र पसंती.सुधारित पीकविमा योजनेत तर फक्त पीक कापणी प्रयोग या एकमेव निकषाप्रमाणे पीकविमा परतावा भरपाई मिळणार असल्याने ग्राम पीक पैसेवारी समितीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. एकूण उत्पादनात जर ३० टक्के किंवा अधिक अनुपात असेल तरच पीकविमा भरपाई मिळण्यास वाव असेल. त्यामुळे ग्राम पीक पैसेवारी समितीत पदसिद्ध व नियुक्त सदस्यांचा समावेश करून काटेकोर अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे..शासनाने चालू हंगामात पीकविमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान हे तीन ट्रिगर बंद केले असून केवळ पीक कापणी प्रयोग या एकमेव ट्रिगरनुसार पीकविमा परतावा दिला जाणार आहे. राज्य सरकारतर्फे जाहीर आकडेवारीनुसार मागील हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत २५५२ कोटी, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीअंतर्गत ७,०१३ कोटी आणि काढणीपश्चात नुकसानअंतर्गत २५९ कोटी रुपयांची भरपाई दिली, असे सांगण्यात आले आहे. .Crop Insurance Payment : विमा परतावा खात्यात जमा होण्यास नांदेडमध्ये सुरुवात.तर पीक कापणी प्रयोगावर आधारित ट्रिगरखाली केवळ ५९ कोटी रुपये दिले गेले आहेत. तरीही आता फक्त हाच एक ट्रिगर लागू केला जाणार आहे. त्यामुळे कमी भरपाई मिळण्याची भीती आहे..विमा कंपनी धार्जिण्या भूमिकेचे गौडबंगाल काय?पीक कापणी प्रयोगानुसार जर अतिशय तुटपुंजी भरपाई मिळणार असेल तर हा एकच ट्रिगर लागू करण्याचे प्रयोजन काय? विमा हप्ता शेतकरी भरणार, नुकसानीचे दावे तांत्रिक बाबींमुळे नामंजूर होणार अशी वस्तुस्थिती असूनही सरकारच्या विमा कंपनी धार्जिणी भूमिकेचे गौडबंगाल काय? या संदर्भांत खुलासा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.