Washim News: कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील पशु वैद्यकीय दवाखाना – श्रेणी १ हा कामरगावसह परिसरातील अनेक गावांसाठी उपचार व पशुसंवर्धन सेवांचा प्रमुख आधार आहे. .या दवाखान्यावर शेतकरी व पशुपालक मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतानाही सध्या येथे कायमस्वरूपी पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती नसल्याने गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. तातडीने अधिकारी व औषधी उपलब्ध करून देण्याची मागणी पशुपालकांमधून केली जात आहे, अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे..Veterinary Services : पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या कामाची ॲपद्वारे नोंद.या ठिकाणी कायमस्वरूपी पशु वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे पशुधनाला वेळेवर उपचार मिळत नाहीत. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत पशुपालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, उपचाराअभावी शेतकऱ्यांचा अमूल्य वेळ व आर्थिक नुकसान होत आहे..Veterinary Service : पशुवैद्यकीय सेवा मोफत द्या.यासोबतच दवाखान्यात गुरांसाठी आवश्यक औषधे, लसी, सर्जिकल साहित्य तसेच उपचारासाठी लागणारी मूलभूत वैद्यकीय साधनसामग्रीही अपुरी आहे. त्यामुळे पशूंच्या उपचारात अडथळे निर्माण होत असून ग्रामीण भागातील पशुपालकांचे हाल होत आहेत..या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्कल प्रमुख शरद तुमसरे यांनी प्रशासनाकडे कामरगाव येथील पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी–१ येथे तातडीने कायमस्वरूपी पशु वैद्यकीय अधिकारी नियुक्त करावा, दवाखान्यात आवश्यक औषधीसामुग्री इतर उपचार साहित्य त्वरित उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.