Chhatrapati Sambhajinagar News: मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ऑक्टोबर अखेरपर्यंत सुमारे ७० हजार ९९३ हेक्टर वरच रब्बीची पेरणी झाली आहे. आधी लांबलेला व अंतिम टप्प्यांतील अति पाऊस याने पेरणी लांबणीवर पडल्या. तर आता थांबलेला पाऊस पुन्हा एकदा अनेक भागात कमी अधिक प्रमाणात बरसत असल्याने रब्बीच्या पेरणीत त्याने खोडा घालण्याची काम केले आहे. .यंदाच्या रब्बी हंगामासाठी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र सुमारे ७ लाख २७ हजार ५७४.८२ हेक्टर इतके आहे. या सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत आत्तापर्यंत केवळ ३५४७ हेक्टर क्षेत्रावरच रब्बीची पेरणी झाली. लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १५ लाख ९ हजार २०७ हेक्टर असताना प्रत्यक्षात ६७ हजार ४४६ हेक्टर वरच रब्बीची पेरणी झाली..Rabi Crop Insurance: रब्बी पीकविमा नोंदणीचे काम सुरू.जिल्हानिहाय अशी आहे पेरणीछत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ३८ हजार ८२१ हेक्टर असताना अनेक भागात अजून वापसा स्थितीत नाही. दुसरीकडे जिथे वापसा आहे तिथे मशागतीची काम सुरू असल्याची स्थिती आहे..जालना : जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ११ हजार ८१९.७२ हेक्टर असताना प्रत्यक्षात केवळ ३६९ हेक्टरवरच रब्बीची पेरणी झाली, जी नगन्य आहे.बीड : जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ७६ हजार ९३३.६ हेक्टर असताना प्रत्यक्षात केवळ ३१७८ हेक्टर क्षेत्रावरच रब्बीची पेरणी झाली. काही ठिकाणी वाफसा स्थिती येत असल्याने मशागतीची कामही सुरू आहेत..Rabi Season: खामगाव तालुक्यात ४० हजार हेक्टरवर यंदा रब्बीचे नियोजन.बीड : जिल्ह्यात रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख २८ हजार असताना प्रत्यक्षात २७८६ हेक्टर क्षेत्रावर रब्बी ज्वारीची पेरणी झाली. जी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत २.२ टक्के इतकीच आहे. जिल्ह्यात हरभऱ्याच सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ६ हजार २३९ हेक्टर असताना प्रत्यक्षात केवळ ३९२ हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे.लातूर : जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख १८ हजार ६८८ हेक्टर असताना प्रत्यक्षात २४ हजार १०७ हेक्टरवरच रब्बीची पेरणी झाली.धाराशिव : जिल्ह्यात रब्बीचे सर्व साधारण क्षेत्र ४ लाख १७ हजार ९०२ हेक्टर असताना प्रत्यक्षात २७ हजार १८९ हेक्टरवरच रब्बीची पेरणी झाली..नांदेड : जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ३२ हजार ४१६ हेक्टर असताना प्रत्यक्षात ५ हजार १८० हेक्टरवरच रब्बीची पेरणी झाली.परभणी : जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ७० हजार ९७९ हेक्टर असताना प्रत्यक्षात ९ हजार ७१ हेक्टरवरच पेरणी झाली. हिंगोली : जिल्हा रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ६९ हजार २२२ हेक्टर असताना प्रत्यक्षात १८९९ हेक्टर क्षेत्रावरच रब्बीची पेरणी झाली..रब्बी विस्तारावर प्रश्नचिन्हवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रब्बी हंगाम पूर्व बैठकीत अति पावसामुळे निर्माण झालेल्या ओलाव्याचा फायदा घेऊन रब्बी क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. त्यामुळे ते प्रयत्न फळाला येतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. परंतु एकीकडे रब्बी पिकांच्या पेरणीचा कालावधी पद्धत जात असताना रब्बी क्षेत्र वाढीसाठी होऊ घातलेले प्रयत्न फळा येतील का हा प्रश्न आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.