Thane News: शेतकऱ्यांची जमीन उद्योगपतीने औद्योगिकरणासाठी विकत घेऊन त्यावर १५ वर्षे कोणताही कारखाना सुरू केला नसल्यास ती जमीन सरकारने पुन्हा त्या शेतकऱ्यांना मूळ किमतीत परत देण्याचा कायदा आहे. या कामी जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांना आदेश देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे..बाळकुम येथील सोनीबाई पाटील यांनी आपली शेतजमीन १९६३ मध्ये राधाकृष्ण रामनारायण प्रा. लिमिटेड यांना औद्योगिक कारणासाठी विकली होती, मात्र, कंपनीने आतापर्यंत या जागेवर कोणतीही कंपनी स्थापन केलेली नाही, मात्र शासनाच्या.Suhana Khan Farmland: शाहरुखची लेक सुहाना शेतजमीन खरेदी प्रकरणात आली अडचणीत.अधिसूचीनुसार औद्योगिक किंवा विशिष्ट प्रयोजनाकरिता संबंधित उद्योजकाने त्या जमिनीवर बांधकाम केले नाही किंवा कंपनी स्थापन केली नाही, तर ती जमीन मूळ मालकाला मूळ किमतीत परत देणे क्रमप्राप्त आहे. यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यासमोर सुनावणीसाठी हे प्रकरण आले असता त्यांनी ११ जुलै रोजी तहसीलदार व बाळकुम मंडळ अधिकाऱ्यांना ही जमीन तातडीने शासनाच्या नावे वर्ग करण्याचा आदेश पारित केला होता, मात्र या आदेशाला महसूल विभागाने हरताळ फासला आहे..Land Measurement : शेतजमीन हिस्से वाटप मोजणी शुल्कात कपात? .मुख्यमंत्र्यांकडे तक्रारजमीन मालक रोहिदास पाटील यांनी महसूल विभागाकडे पत्रव्यवहार करून वारंवार पाठपुरावा केला आहे. तसेच, पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात तक्रार दाखल केली आहे, परंतु अजूनही महसूल अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होत असल्याने रोहिदास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे तक्रार केली आहे..तहसीलदारांकडे सहीसाठी प्रलंबितया प्रकरणासंदर्भात जिल्हाधिकारी यांचे आदेश पारित झाला असून, हे प्रकरण तहसीलदार यांच्याकडे सहीसाठी प्रलंबित आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत हे प्रकरण निकाली निघेल, असे बाळकुमचे मंडळ अधिकारी शशिकांत जगताप यांनी सांगितले आहे, तर यासंदर्भात तहसीलदार उमेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.