Women Welfare: राज्यातील लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा न झाल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. डिसेंबर अखेर येऊनही पैसे न मिळाल्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते एकत्र मिळणार का, असा सवाल महिलांकडून उपस्थित केला जात आहे.