Rabi Crop Insurance: अकोलाच्या तेल्हारा तालुक्यातील शेतकरी २०२४-२५ रब्बी हंगामातील हरभरा पिकाच्या पीकविमा भरपाईपासून अद्याप वंचित असल्याचा मुद्दा गंभीर बनला आहे. या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा सुरू असून शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय तसेच पीकविमा जिल्हा कार्यालयात अनेकदा चकरा मारल्या आहेत. .या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या विनंतीनुसार जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात एचडीएफसी जनरल इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी, शेतकरी आणि कृषी विभाग अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली.मात्र, त्यातही काही समाधान झालेले नाही. या बैठकीत शेतकरी आणि पीकविमा कंपनी यांच्यातील प्रलंबित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. मात्र, विमा कंपनीने उशिरा सर्वेक्षण झाल्याचा मुद्दा कायम ठेवत नुकसानभरपाई देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली..Rabi Crop Insurance: परभणीत रब्बीतील ४६.५१ टक्के क्षेत्रावरील पिकांना विमा संरक्षण.यावर जिल्हा अधीक्षकांनी सर्वेक्षण कृषी विभागामार्फत करण्यात आले असल्यामुळे शेतकरी नुकसानभरपाईसाठी पात्र असल्याचे कंपनी प्रतिनिधींना सांगितले.या बैठकीचा लेखी अहवाल मिळण्याची शेतकरी वाट पाहत आहेत. जर या चर्चेतून समाधानकारक तोडगा निघाला नाही, तर पुढील कार्यवाहीसाठी अमरावती विभागीय कृषी संचालकांकडे जाण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे..Crop Insurance: 'पीकविम्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत पुढील आठवड्यात बैठक घेणार'.या बैठकीस प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मुरली इंगळे,कृषी उपसंचालक हरीष देशमुख, अकोटचे उपविभागीय कृषी अधिकारी तुषार ढंगारे, तांत्रिक अधिकारी शिरीष घनबाहादूर, तालुका कृषी अधिकारी शुभम बुरांडे, मंडळ अधिकारी गौरव राऊत, रंजना देशमुख तसेच शेतकरी अरविंद अवताडे, निलेश अवताडे, निलेश देशमुख, प्रमोद गावंडे, शिवकुमार मार्के, सागर देशमुख, प्रतिक अवताडे, गोपाल अघडते, प्रवीण मार्के, राजेश झापर्डे आदी उपस्थित होते..दरम्यान, शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार विमा कंपनीला मार्च महिन्यात सूचना दिली होती. त्यानंतर एप्रिलमध्ये सर्वे करण्यात आला. त्यावेळी विमा कंपनी, कृषी विभागाचे अधिकारी यांनी येऊन पाहणी केली. शेतकऱ्यांना तशी माहिती देण्यात आली होती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.