Soybean Seed Germination Issues: विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांत सोयाबीन बियाण्यांची अपेक्षित उगवण न झाल्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली असून, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. काही खासगी कंपन्यांच्या विशिष्ट वाणांविरोधात तक्रारी दाखल होत असून, संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई, नुकसान भरपाई आणि पर्यायी बियाण्यांची तातडीने उपलब्धता करून देण्याची मागणी जोर धरत आहे. काही ठिकाणी आंदोलन करण्यात आले असून कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतांची पाहणी सुरू केली आहे..अकोला जिल्ह्यात सुमारे २०० हून अधिक शेतकऱ्यांनी याबाबत कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या असून, काही कंपन्यांच्या बियाण्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश काढले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत कृषी विभागाने तातडीने तपासणी सुरू करावी, अशी मागणी होत आहे..पुरेशी ओल निर्माण झाल्यानंतर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली, मात्र आठ ते दहा दिवस उलटूनही बियाण्यांची उगवण झाली नाही. अकोला तालुक्यात आतापर्यंत २५ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. विशेष म्हणजे ट्रुथफुल तसेच प्रमाणित बियाण्यांबाबत तक्रारींचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे..Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा.मोर्शी तालुक्यात ठिय्या आंदोलनअमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात विविध गावांमध्ये खासगी कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांची उगवण न झाल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी प्रथमेश माने यांनी आंदोलनकर्त्यांसह मौजा लाडकी, कशीमपूर आणि खोपडा परिसरातील शेतांची प्रत्यक्ष पाहणी केली. संबंधित खासगी कंपनीविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली..दुबार पेरणीचे संकटवर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील विजयगोपाल परिसरात दोषपूर्ण बियाण्यांमुळे ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांच्या सोयाबीनसह इतर पिकांची उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी देवळी कृषी विभाग आणि संबंधित कृषी सेवा केंद्रांकडे तक्रारी दाखल केल्या. या तक्रारींची दखल घेत कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून संबंधित बियाणे कंपनीचे जिल्हा वितरक व अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतांची पाहणी करून बियाण्यांची उगवण न झाल्याची खात्री केली. त्यानंतर नुकसान भरून काढण्यासाठी विजयगोपाल परिसरातील शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी सुमारे १०० ते १२५ बॅग सोयाबीन बियाणे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. मात्र, आश्वासनानंतरही प्रत्यक्षात बियाण्यांचा पुरवठा झालेला नाही..Soybean Crop Damage: गोगलगायींकडून कोवळे सोयाबीन फस्त.आजमितीला खरीप हंगामातील सोयाबीन पेरणीनंतर काही विशिष्ट कंपन्यांच्या वाणांमध्ये उगवण क्षमता कमी असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत. याची तातडीने दखल घेऊन कृषी अधिकाऱ्यांनी कारवाई करावी.रणधीर सावरकर, आमदार, अकोला.ज्या शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीनची उगवण झालेली नाही किंवा अत्यंत कमी झाली आहे, त्यांनी घाबरून न जाता तातडीने आपल्या भागातील कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार नोंदवावी. विवेक बिऱ्हाडे, उपविभागीय कृषी अधिकारी, अकोला.निकृष्ट बियाणे विक्रीच्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. संबंधित कंपनी, वितरक व विक्रेत्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी.हितेश साबळे, जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस.सोयाबीन बियाणे कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शेतात पाहणी करून गेले. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पर्यायी बियाणे देण्याची ग्वाही त्यांनी दिली होती. मात्र, दोन दिवस उलटूनही बियाणे मिळालेले नाही.राहुल पेटकर, संचालक, कृषी सेवा केंद्र, विजयगोपाल.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.