Farmers Distress : जळगाव खानदेशात खरिपातील पिकांची हानी झाली आहे. काही पिके मळणीवरच आली नाहीत. कारण पावसाने ओढ दिली. खरिपात हानीनंतर आता शेतकऱ्यांना रब्बीबाबत अपेक्षा आहे. खानदेशात जलसाठा काही भागात मुबलक तर काही भागात कमी आहे. .त्यात रब्बीसाठी यंदा गिरणासह अन्य सिंचन प्रकल्पांतून सिंचनासाठी पाणी मिळणार आहे. खरिपात पिकांचे मातेरे झाले. आता रब्बीत खरिपातील नुकसानीची भरपाई निघेल, अशी अपेक्षा आहे..Mahabeej Seed Distribution Plan: शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचणार महाबीजचे बियाणे; महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामींची माहिती.रब्बीतील पिकांत सध्या चोपडा, जळगाव भागात कोरडवाहू हरभरा, दादर ज्वारी पेरणी सुरू आहे. उडीद, मूग पिकाखाली रिकाम्या झालेल्या व रब्बीसाठी नापेर ठेवलेल्या क्षेत्रात पेरणी सुरू आहे. दसरा सणापूर्वी कोरडवाहू क्षेत्रातील पेरणी काळ्या कसदार जमिनीत व जलस्त्रोत उपलब्ध असलेल्या भागात होईल. यंदा पावसाच्या लहरीपणामुळे मका, ज्वारी, कोरडवाहू कापूस, मूग, उडीद पिकाला फटका बसला..खानदेशात काही प्रमुख सिंचन प्रकल्प भरले आहेत. त्यात गिरणा, हतनूर, अंजनी, अग्नावती, हिवरा, मोर, अभोडा, मंगरूळ, सुकी, धुळ्यातील पांझरा, अनेर आदी प्रकल्पांचा समावेश आहे. या सर्वच प्रकल्पांतून पुढे रब्बीला पाणी मिळेल, असे दिसत आहे..Water Distribution : पाणीवाटपाचे प्रश्न जागेवरच सोडवा.गिरणा धरणातून मागील हंगामातही रब्बीला पाणीच मिळाले होते. हे धरण मागील वेळेसही १०० टक्के भरले होते. यंदाही हे धरण १०० टक्के भरले. यामुळे गिरणा पट्ट्यातील २१ हजार हेक्टरला या धरणातून पाणी मिळणार आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात हतनूर, धुळ्यात अनेर या प्रकल्पांतूनही रब्बीस पाणी मिळणार आहे. सध्या गिरणा व तापी पट्ट्यातील काही तालुक्यांत स्थिती बरी आहे..मका, गहू घटणारकापूस पीक घेऊन त्यात हरभरा पेरा करण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. पूर्वहंगामी कापूस पिकाखालील क्षेत्र त्यासाठी शेतकरी ऑक्टोबरच्या अखेरीस रिकामे करण्यास सुरुवात होईल. त्यात पूर्वमशागत करून हरभरा, भाजीपाला पिके घेतली जातात. पण यंदा मका व गहू पेरणी कमी होईल, असे सांगितले जात आहे..पेरणी कमी होणारहरभरा, दादर ज्वारी, मका, भाजीपाला पिके, कांदा, सोयाबीनची पेरणी रब्बी हंगामात सुमारे ८० टक्के होईल, अशी अपेक्षा आहे. उन्हाळ पिकांचीदेखील पेरणी होणार आहे. कमी पाण्यात येणाऱ्या पिकांच्या पेरणीचे नियोजन अनेकांनी केले असून, सुमारे दीड लाख हेक्टरपर्यंत जळगाव जिल्ह्यात रब्बीतील क्षेत्र पोचेल, असा अंदाज आहे. परंतु रब्बीत मका, गहू, ज्वारी पीक परवडत नाही. कारण पाणी अधिक लागते. मक्यात अळीची समस्या असते, असेही शेतकरी मानतात. खरिपातील पिके परवडली नाहीत. या स्थितीत यंदा रब्बीबाबत अपेक्षा आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.