डॉ. कैलास दौंड Education Innovation: भारतीय जैन संघटना संचलित माध्यमिक विद्यालय तुकाराम नगर पुणे येथे १० जून १९९४ पासून संपत गर्जे सेवारत आहेत. येथे ते इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाचे अध्यापन करतात. दरवर्षी दहा तुकड्यांमधील विद्यार्थ्यांना त्यांनी अध्यापन केले. वारकरी कुटुंबातून आलेले असल्यामुळे आणि संतांचा वारसा लाभलेला असल्यामुळे गर्जे सरांमध्ये परोपकारी वृत्ती आपसूकच आलेली आहे. .अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मातृभाषेचे अध्यापन करताना संपत गर्जे यांनी विद्यार्थ्यांच्या भाषिक अभिव्यक्तीला सतत प्रोत्साहन दिलेले आहे. त्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना अतिरिक्त मार्गदर्शन करून वक्तृत्व स्पर्धेतील सहभाग वाढवला. उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा हा त्यांचा विद्यार्थ्यांचा आवडता उपक्रम बनला. त्यामुळे शाळा पातळी ते राज्य पातळीवरील वक्तृत्व स्पर्धेमध्ये गर्जे यांच्या विद्यालयातील विद्यार्थी नेहमीच बक्षिसाला पात्र ठरतात..लेखनामध्ये नेमकेपणा आणि मुद्देसूदपणा यावा याकरिता त्यांनी निबंध लेखन स्पर्धेसाठी अवांतर वाचनाची पुस्तके पुरवून विद्यार्थ्यांना तयार केले. त्यामुळे विद्यार्थी विज्ञान प्रदर्शनानिमित्त घेण्यात येणाऱ्या निबंध स्पर्धा, मतदार जागृती साठी घेण्यात येणाऱ्या निबंध स्पर्धा व अन्य शासकीय निबंध स्पर्धा अशा स्पर्धांमध्ये नेहमी प्रथम येतात..Rural Development: गावाने पुढाकार घेऊन केले पाणंद रस्ते.कविता लेखन-वाचन स्पर्धाविद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी निबंध लेखनाबरोबरच त्यांनी कविता लेखन आणि कविता वाचन या स्पर्धेचे प्रतिवर्षी आयोजन केले. त्यामुळे इयत्ता अकरावी व बारावी मधील नवनवोन्मेषशालिनी प्रज्ञेच्या विद्यार्थ्यांनी कविता लेखन केले. कविता वाचनाचे कौशल्य ही प्राप्त केले. लेखक आपल्या भेटीला हा अत्यंत प्रभावी ठरणारा उपक्रम संपत गर्जे यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी सतत राबवला. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या लेखकांना भेटता व ऐकता आले. त्यातून साहित्य विषयक गोडी निर्माण झाली. स्वतःच्या अनुभवलेखनाला प्रेरणा मिळाली..शंभर टक्के निकालविद्यालयातील मराठी विषयाचा वार्षिक निकाल प्रतिवर्षी १०० टक्के उत्तीर्ण लावण्याची एक वैभवशाली परंपरा गर्जे सरांनी परिश्रमपूर्वक व नावीन्यपूर्वक अध्यापनातून निर्माण केली. त्यासाठी दरवर्षी किमान पाच ते सात प्रश्नपत्रिका नियोजित वेळेत विद्यार्थ्यांकडून सोडवून घेण्याचा व तपासून त्यातील त्रुटी दाखवण्याचा व त्या निवारण करण्याचा उपक्रम त्यांनी सतत चालवला. काही ठिकाणांना प्रत्यक्ष भेटी दिल्याने विद्यार्थ्यांच्या अनुभवामध्ये नावीन्यपूर्ण गोष्टी येतात. त्याचा अविस्मरणीय ठसा त्यांच्या मनोपटलावर उमटतो. त्यातून सामाजिक, भावनिक व कलाविषयक जाणीव वृद्धिंगत होतात याची जाणीव ठेवून त्यांनी हाफकिन इन्स्टिट्यूट, लष्कराचे शस्त्र प्रदर्शनास भेट देण्याची विद्यार्थ्यांना संधी दिली..Education Innovation: लिहायला लावणारा शिक्षक .भूज गुजराती येथे झालेल्या भूकंपात भारतीय जैन संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या शालेय पुनर्वसन प्रकल्पात संपत गर्जे यांनी कृतीयुक्त सहभाग दिला. १९९३ च्या किल्लारी (लातूर) भूकंपग्रस्त विद्यार्थी विद्यालयात आल्यानंतर त्यांना गर्जे सरांनी अतिरिक्त अध्यापन केले. प्लॅस्टिक सर्जरी शिबिरात समन्वयक म्हणून देखील संपत गर्जे यांनी काम केलेले आहे. इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांच्या क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी व बक्षिसासाठी जवाहर शिक्षण मंडळ पुणे यांना त्यांनी आर्थिक स्वरूपात मदत केली..अनाथ शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुस्तके, गणवेश यासाठी नेहमी आर्थिक मदत केली. स्वतः नोकरीच असलेल्या विद्यालयातील ग्रंथालयास ग्रंथ संग्रहाची भेट दिली. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री सहाय्यता निधी, केरळ राज्य सरकारला पूरग्रस्तांसाठी निधी, पंतप्रधान सहाय्यता निधी यांनाही आपल्या परीने यांनी मदत केली. तसेच विविध विद्यालये व महाविद्यालये या ठिकाणी सरांनी प्रबोधन पर व्याख्याने दिलीत. ते अविवाहित असून पूर्ण वेळ शिक्षक आणि समाजशिक्षक म्हणून कार्य करतात..महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आयोजित अकरावी व बारावीच्या कृतीयुक्त प्रशिक्षण कार्यशाळेत राज्यस्तर ते तालुकास्तर तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केले. त्यांनी ‘शब्द आशयाचे घन’ हा कवितासंग्रह आणि अभंगाची मूल्यगंगा, सारांश लेखन आदी पुस्तकांचे लेखन केले आहे..भारतीय जैन संघटनेच्या ‘जिद’ या मुखपत्राचे ते आठ वर्ष कार्यकारी संपादक होते. गर्जे यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी महाराष्ट्र शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार व इतर सामाजिक संस्थांचे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. सर नुकतेच सेवानिवृत्त झाले असून आता पाथर्डी येथे वास्तव्यास आहेत. येथेही ते काही विद्यार्थ्यांना निःशुल्क शैक्षणिक मार्गदर्शन स्वतःचा वेळ देऊन करतात हे विशेष!संपत गर्जे ९४०३३५८२२२(लेखक नामांकित साहित्यिक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.