Pune News: तेलबिया पिकांमध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या सूर्यफूलाकडे पुणे विभागातील शेतकऱ्यांचे यंदा काहीसे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. रब्बी हंगामात सूर्यफुलाची सरासरी ३५१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ ३१७ हेक्टरवर म्हणजेच सुमारे ९० टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. काही तालुक्यांमध्ये या पिकाची पेरणी अत्यल्प असून त्यामुळे एकूण क्षेत्रात घट होत असल्याचे दिसून येत आहे..यंदा लांबलेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील पेरणी उशिराने सुरू झाली. त्यातच अनेक शेतकऱ्यांनी पीकबदलाचा निर्णय घेतल्याने सूर्यफूल पिकाला फटका बसला आहे. सध्या पिकांची अवस्था समाधानकारक असली तरी काही ठिकाणी वाढ मंदावली आहे. .Sunflower Cultivation: उन्हाळी सूर्यफुलाचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी योग्य लागवड पद्धत .थंडीचे प्रमाण अधिक असल्याने सुरुवातीला पिके जोमदार आली होती; मात्र अधूनमधून बदललेल्या हवामानामुळे रोग व किडींचा काही प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तविली आहे. सूर्यफुलाची खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तिन्ही हंगामात पेरणी केली जाते. .सध्या रब्बी हंगामातील सूर्यफुलाची वाढ चांगली असली तरी एकूण क्षेत्र घटल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यात तेलबिया पिकांबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आल्यामुळे येथे सूर्यफुलाची पेरणी तुलनेने अधिक झाली आहे. यंदा सर्वाधिक पेरणी बारामती तालुक्यात झाली असून सरासरी ८४ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ८५ हेक्टरवर पेरणी झाली आहे..Sunflower Farming: उन्हाळी सूर्यफुलाचे उत्पादन वाढवण्यासाठी लागवड तंत्र .हवेली, इंदापूर आणि दौंड तालुक्यांमध्येही तुरळक प्रमाणात पेरणी झाली आहे. नगर जिल्ह्यात नगर व कोपरगाव तालुक्यांत मर्यादित क्षेत्रावर सूर्यफुलाची लागवड झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात मात्र सूर्यफूल पिकाचे महत्त्व वाढत असून उत्तर सोलापूर, अक्कलकोट, माढा, सांगोला व मंगळवेढा या तालुक्यांत बऱ्यापैकी पेरणी झाल्याचे चित्र आहे. .सूर्यफूल पिकाची झालेली पेरणी : (हेक्टरमध्ये)जिल्हा -- सरासरी क्षेत्र -- पेरणी झालेले क्षेत्र -- टक्केवारीनगर -- १०८ -- २९ -- २७पुणे -- १०७ -- १२३ -- ११५सोलापूर -- १३६ -- १६५ -- १२२एकूण -- ३५१ --३१७ -- ९०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.