Ahilyanagar News : खरीप पिकांसाठी सध्या असलेल्या पंतप्रधान पीकविमा योजनेत यंदा अहिल्यानगर जिल्ह्यात सहभाग अत्यंत कमी आहे. यंदा आतापर्यंत २ लाख १० हजार १३८ शेतकऱ्यांनी ४ लाख ४९ हजार ४८५ अर्ज करून २ लाख ३७ हजार ७१५ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला आहे. .६ लाख ६२ हजार ०९१ शेतकऱ्यांनी ११ लाख ७० हजार ०९४ अर्जातून गेल्या वर्षी ६ लाख ७३ हजार ९३७ हेक्टर क्षेत्रावर विमा उतरवला होता. एक रुपयांत विमा योजना बंद झाल्याने सहभाग घटल्याचे सांगितले जात आहे..Crop Insurance : सांगलीत ६३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके विमा संरक्षित.अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा खरिपात आतापर्यंत ७ लाख हेक्टरच्यावर (सरासरीपेक्षा अधिक) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. अवेळी पाऊस, वादळ व नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी आणि झालेले नुकसान भरून निघावे यासाठी पंतप्रधान पीकविमा योजना राबवली जाते. .गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी केवळ एक रुपया भरून विमा योजनेत सहभागी होता येत होते. यंदा मात्र ही योजना बंद झाली. त्याचा परिणाम यंदा विमा योजनेतील सहभागावर दिसून येत आहे. २ लाख १० हजार १३८ शेतकऱ्यांनी ४ लाख ४९ हजार ४८५ अर्ज करून २ लाख ३७ हजार ७१५ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला आहे. .Crop Insurance : बँकांनी १५ दिवसांत भरला १४०० जणांचा पीकविमा.यंदा एक रुपयांत विमा नाही त्यामुळे आतापर्यंत शेतकऱ्यांनी २५ कोटी २८ लाख ८ हजार ७२२ रुपये विमा हप्तातून भरले असून केंद्र व राज्य सरकारने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी १६० कोटी ४१ लाख ८२ हजारांचा हप्ता भरला असून १२३७ कोटी ३८ लाख रुपये संरक्षित झाले आहेत. .गेल्या वर्षीपेक्षा यंदा चार लाखांपेक्षा अधिक क्षेत्र आणि शेतकरी संख्याही कमालीची घटली आहे. कर्जत, श्रीरामपूर, श्रीगोंदा तालुक्यात सहभागी शेतकरी संख्या कमी आहे तर नेवासा, शेवगाव, पाथर्डी तालुक्यात शेतकरी सहभाग अधिक आहे.तालुकानिहाय शेतकरी संख्या (कंसात अर्ज)अहिल्यानगर १०३८५ (२०,९१६)अकोले १२,६२० (३३,६८९)जामखेड २०,६५८ (५१,५५१)कर्जत ९,८८० (२३,९५०)कोपरगाव १३,५०० (२०,१९८)नेवासा ३३,९७७ (४५,३४०)पारनेर २१,२८२ (५०,६८५)पाथर्डी २१,९४३ (६०,८८७)राहाता १५,६७१ (२२,४६६)राहुरी १५,६७१ (२३,५०४)संगमनेर १३,९१६ (२८,७३४)शेवगाव १९,८४८ (३९,३४६)श्रीगोंदे ७,३५१ (१३,५५१)श्रीरामपूर १०,७८१ (१४,६६८).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.