Khandesh Agriculture News: खानदेशात सलग दुसऱ्या वर्षी कापूस लागवडीत घट होणार आहे. एकूण लागवड आठ लाख हेक्टरपेक्षा कमी होईल, असा अंदाज आहे. यात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक पावणेपाच लाख हेक्टरवर कापूस पीक राहू शकते..जळगावात राज्यात सर्वाधिक कापूस लागवड केली जाते. सर्वाधिक कापूस लागवडीच्या मालिकेत जळगाव यंदाही राज्यात पुढे असणार आहे. परंतु जळगावसह धुळे व नंदुरबारात सलग दुसऱ्या वर्षी कापूस लागवड कमी होईल. जळगाव जिल्ह्यात २०२२ मध्ये पाच लाख ६७ हजार हेक्टरवर कापूस पीक होते. २०२३ मध्ये कापसाची लागवड पाच लाख ५४ हजार हेक्टरवर झाली होती. २०२४ मध्ये पाच लाख ११ हजार हेक्टरवर लागवड झाली होती. तर मागील हंगामातील लागवड सुमारे चार लाख ८० हजार हेक्टरवर होती..Cotton Rate: कापसाच्या भावात अचानक तेजी नेमकी कोणत्या कारणांनी आली ?.२०२२ मध्ये खानदेशात कापसाची लागवड आठ लाख ७० हजार हेक्टरवर झाली होती. २०२३ मध्ये ही लागवड साडेआठ लाख हेक्टरवर खाली आली. तर २०२४ मध्ये कापूस लागवड खानदेशात आठ लाख ३० हजार हेक्टरवर होती. धुळ्यात सुमारे एक लाख ६० हजार हेक्टरवर आणि नंदुरबारात सुमारे ८० हजार हेक्टरवर कापूस लागवड होईल. धुळ्यातील लागवडीत मोठी घट होताना दिसत आहे..Cotton Soybean Market Rates; कापूस, सोयाबीन, मका, भेंडी, लिंबू बाजारभाव अपडेट|Agrowon.पीक बनतेय नुकसानीचेकापूस पिकात कुठलाही नफा नाही. नुकसान सतत येत आहे. गुलाबी बोंड अळी व मजूरटंचाई, कमी दर अशी समस्या आहे. यामुळे कापूस पिकाऐवजी सोयाबीनकडे अनेक कोरडवाहू शेतकरी वळतील, असे दिसते. तर ज्यांच्याकडे कृत्रिम जलसाठे मुबलक आहेत, त्यातील अनेक शेतकऱ्यांनी पपई, केळीला पसंती दिली आहे. काहींनी क्षेत्र कमी करण्याचे नियोजन केले आहे..जळगावची आघाडी कायमजळगाव जिल्हा कापूस लागवडीत मागील अनेक वर्षे राज्यात आघाडीवर आहे. जळगाव जिल्ह्यात यंदा लागवड कमी होईल. परंतु राज्यात सर्वाधिक कापूस लागवड करणारा जिल्हा म्हणून जळगाव अग्रेसर असणार आहे. जळगावपाठोपाठ राज्यात यवतमाळमध्ये कापूस लागवड केली जाते. तेथे दरवर्षी साडेचार लाख हेक्टर किंवा यापेक्षा कमी लागवड असते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.