Parbhani News : अतिवृष्टीमुळे शेतकरी, शेजमजूर संकटात असताना मदतीच्या बाबतीत सरकार खरे बोलत नाही. ‘बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात’ अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वास राहिला नाही..पाषणहृदयी सरकारने तत्काळ चूक दुरुस्त करावी. पीकनुकसानीबद्दल एकरी ५० हजार रुपये मदत द्यावी. हीच योग्य असल्यामुळे विनाअट शेेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी. शेतमजुरांनादेखील श्रम नुकसानभरपाई द्यावी, अशा मागण्या राज्य किसान सभेचे सचिव डॉ. अजित नवले यांनी केल्या..परभणी येथे पत्रकार परिषदेत रविवारी (ता. २८) डॉ. नवले बोलत होते. ते म्हणाले, ‘‘अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यातील सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिके संपूर्णपणे नष्ट झाली आहेत. गोदावरी नदीकाठच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. सुपीक मातीचा थर वाहून गेल्यामुळे त्या ठिकाणी रब्बी पेरणी करणे शक्य नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे..Farmer Loan Waiver: कर्जमाफीचा शब्द पाळू; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच शेतकऱ्यांना आश्वासन.या स्थितीत पंजाब सरकारप्रमाणे भरीव मदत करणे अपेक्षित आहे. परंतु मागील तीन महिन्यांतील अतिवृष्टीच्या मदतीचे आकडे मुख्यमंत्री सांगत आहेत. पीकविमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्तीसह अन्य ट्रिगर बंद केल्यामुळे शेतकरी भरपाईपासून वंचित राहिले आहेत. .भारतीय जनता पक्ष-आरएसएस यांच्याकडून शेतकरी एकजुटीमध्ये फूट पाडण्याचे तसेच जाती-धर्मांत, शेतकरी जातीमध्ये भांडणे लावण्याचे काम केले जात आहे. नादान अधिकारी तसेच प्रशासनावर राज्य सरकारचा वचक राहिलेला नाही.’’ ‘‘ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी पीकनुकसानीबद्दल एकरी ५० हजार रुपये तर श्रम नुकसानीबद्दल शेतमजुरांना प्रतिकुटुंब २५ हजार रुपये भरपाई द्यावी. .पीकविमा योजनेतील ट्रिगर पूर्वीप्रमाणे लागू करावेत या मागण्यांसाठी किसान सभा, शेतमजूर युनियन, सी टू कामगार संघटनेच्या वतीने मंगळवारी (ता. ३०) छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, असे डॉ. नवले यांनी सांगितले. या वेळी रामेश्वर पौळ, उद्धव पौळ, दीपक लिपणे, दतुसिंह ठाकूर, रामराजे महाडीक उपस्थित होते..Farmer Loan Waiver : कर्जमुक्तीसाठी‘हर घर, हर खेत काला झेंडा’.गुंठ्याला ८५ रुपये देऊन सरकार निर्दयता दाखवतेयछत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर किसान सभेच्या माध्यमातून मराठवाड्यात विविध ठिकाणी भेटी दिल्या जाणार आहेत. या भेटीपूर्वी शनिवारी (ता. २७) डॉ. नवले यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला..नैसर्गिक आपत्तीत न भरून निघणारे नुकसान झाले असताना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देताना गुंठ्याला ८५ रुपये देऊन सरकार निर्दयता दाखवते आहे. मदत दिलेली नसताना मुख्यमंत्र्यांनी मदत देऊन आलो, असे सांगून फसवणूक केली. ज्या मागण्या आम्ही करतो आहोत त्यावर शासनाने न्यायचीत भूमिका न घेतल्यास सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही याविषयी जनतेत जागर केला जाईल, असेही ते म्हणाले. या वेळी भगवान भोजने, लक्ष्मण साक्रुडकर, लोकेश कांबळे आदींची उपस्थिती होती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.