Marathwada Farmers : किल्लेधारूर पावसाने प्रदीर्घ काळ दडी मारल्यामुळे तालुक्यातील खरीप पिके संकटात सापडली आहेत. शेतातील उभी पिके करपू लागल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले असून, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून किल्लेधारूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने तहसील प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते..तालुक्यातील विविध भागांत मागील अनेक दिवसांपासून पावसाचा मोठा खंड पडला आहे. सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने खरीप पिकांची पेरणी केली होती. मात्र, पेरणीनंतर ऐन वाढीच्या काळातच पावसाने पाठ फिरवली. अपेक्षित पाऊस न झाल्याने पिकांची वाढ खुंटली आहे..Farm Irrigation: पावसाच्या दडीमुळे पिकांना तुषार सिंचनाचा आधार.अनेक ठिकाणी सोयाबीन, कापूस आणि बाजरी यांसारखी महत्त्वाची पिके पाण्याअभावी डोळ्यांदेखत करपू लागली आहेत. सध्या पिकांना पावसाची नितांत गरज असताना निसर्गाने दडी मारल्याने बळिराजाच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.आगामी काळातही समाधानकारक पाऊस न झाल्यास खरीप हंगामाचे कधीही भरून न येणारे नुकसान होणार आहे..Jalgaon Rainfall Deficit: जळगावात पावसाअभावी पिके कोमेजण्याच्या मार्गावर.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, पीकविमा मंजूर करावा तसेच जनावरांसाठी चारा व पाण्याची उपलब्धता करावी. परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून किल्लेधारूर तालुक्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करावा, असे प्रशासनाला दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आल्याची माहिती देण्यात आली..चाऱ्याचा प्रश्नही आता गंभीरपावसाअभावी केवळ पिकांचेच नव्हे, तर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्नही आता गंभीर बनला आहे. या दुहेरी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने तालुक्यातील या दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून वाळलेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करावेत, अशी मागणी जोर धरत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.