Crop Failure Relief : अमरावती दर्यापूर तालुक्यात सुमारे २१ दिवसांपासून पावसाने खंड दिल्याने सोयाबीन, कापसासह खरीप पिकांची वाढ खुंटली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नीलेश मोपारी यांनी केली आहे..यंदा पेरणीला जवळपास एक महिन्याचा विलंब झाला. त्यानंतरही पावसाच्या अनियमिततेमुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. दुबार पेरणीचा अतिरिक्त खर्च झाल्यानंतर आता पिके महत्त्वाच्या वाढीच्या अवस्थेत असताना पावसाने पुन्हा दडी मारली आहे..Heavy Rainfall: जुन्नर-नारायणगाव परिसरात पावसाचा दणका.दर्यापूर तालुक्यात सोयाबीन पीक सध्या फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे. मात्र, या महत्त्वाच्या टप्प्यावर पुरेसा पाऊस न झाल्याने पिकाच्या वाढीवर परिणाम होत असून उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कापसाचीही वाढ खुंटली असून पावसाअभावी पिकांवर मावा व तुडतुडे यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..Rainfall Deficit: पावसाअभावी आता खरिपाची पिके संकटात.किडींच्या नियंत्रणासाठी वारंवार कीटकनाशकांची फवारणी करावी लागत असल्याने उत्पादन खर्चात वाढ होत आहे. एकीकडे दुबार पेरणीचा खर्च, तर दुसरीकडे पावसाचा प्रदीर्घ खंड आणि वाढता कीडनियंत्रण खर्च यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे..प्रशासनाने दर्यापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून पिकांची सद्यःस्थिती तपासावी. पावसाच्या खंडामुळे झालेला परिणाम, दुबार पेरणीचा खर्च आणि पिकांच्या नुकसानीची वस्तुस्थिती यांचा आढावा घेऊन सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे तातडीने पाठवावा, अशी मागणीही मोपारी यांनी केली..दर्यापूर तालुक्यातील परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रशासनाकडे केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.