Pune News: दौंड तालुक्यात गेल्या सहा महिन्यांपासून टप्प्पाटप्प्याने पाऊस पडत आहे. अतिरिक्त झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर राहिलेल्या शेतमालालाही योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी उत्पादन खर्चासाठी पैसे घेतल्याने कर्जाच्या विळख्यात सापडला आहे. यामुळे जगायचे कसे? असा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांना पडला आहे..तालुक्यात तेरा मेपासून चालूवर्षी पावसाला सुरुवात झाली आहे. मेमध्ये सरासरी ३५० मिलिमीटर पाऊस पडला. त्यानंतरही पाऊस सुरूच राहिला. सातत्याने झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील हातातोडांशी आलेली बाजरी, मका, उडीद, सोयाबीन, हळवी कांदा, कपाशी या पिकांना फटका बसला आहे. तर टोमॅटो, खरबूज या पिकांचेही नुकसान झाले आहे..Farmer Death: पैठण तालुक्यात पूरामुळे शेतीचे नुकसान; कर्जाच्या ओझ्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या.अशातच दिवाळीनंतरही आठ दिवस ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. यामुळे कांदा रोपवाटिका, कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांना दुबार कांदा रोपवाटिका तयार करावी लागणार आहे. अतिरिक्त पावसाने वेचणीस आलेला कापूस काळसर होऊन मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या उसाच्या लागवडी वाया गेल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांना दुबार उसाची लागवड करावी लागणार आहे. एकंदरीत चालूवर्षी अतिरिक्त पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, पिके वाया गेली आहेत..तालुक्यातील शेतकऱ्यांना जून व सप्टेंबर महिन्यात झालेल्या पिकांच्या नुकसाणीची भरपाई मिळणार आहे. परंतु अल्प प्रमाणात मिळणाऱ्या भरपाईमुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरून आलेले नाही. अशातच उडीद, कापूस, मका, सोयाबिन या पिकविलेल्या मालालाही चांगला बाजारभाव मिळत नाही. टोमॅटोचेही भाव घसरलेले आहेत. दिवाळी होऊनही गरवी कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळू शकलेला नाही..Soybean Farmer Crisis: सोयाबीनचे उत्पादन कमी, भावही नाही.एकीकडे रासायनिक खते, औषधे, मजुरी यांच्या बाजारभावात वाढ झालेली आहे. परंतु पावसानेनुकसान होऊनही राहिलेल्या शेतीमालाला चांगला बाजारभाव मिळत नाही. शेतकऱ्यांनी पतसंस्था, बँका, सावकारी कर्ज काढूनशेतामध्ये खर्च केला आहे. परंतु अतिरिक्त झालेला पाऊस, झालेले नुकसान व मिळणारा बाजारभाव यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाल्याचे आहेत..शेतीमालाला सध्या प्रतिक्विंटला मिळत असलेला बाजारभाव (रुपयांत)कापूस ७१०० ते ७५००उडीद ४००० ते ६०००कांदा गरवी १००० ते २०००सोयाबीन ४२०० ते ४४००मका १६०० ते १९००.दौंड तालुक्यात २०२५ या वर्षात सर्वाधिक सातत्याने पाऊस झाला आहे. दिवाळीनंतरही अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या शेतीमालाला बाजारभावही समाधानकारक मिळत नाही. यामुळे शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडला आहे.मधुकर पाचपुते, शेतकरी, बोरीबेल, ता. दौंड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.