Oilseed Farming: खानदेशात यंदा तीळ पेरणीचे क्षेत्र घटले असून, बहुतांश भागांत तीळ मळणी पूर्ण झाली आहे. मळणीच्या काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात नुकसानही झाले आहे..खानदेशात रब्बी किंवा उन्हाळी हंगामात तेलबिया पिकांमध्ये भुईमूग व सूर्यफूल पिकाला अधिक प्राधान्य दिले जाते, तर तीळ लागवड तुलनेने कमी असते. यंदाही तीळ पेरणी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. तीळ पेरणी डिसेंबर अखेरीस सुरू झाली होती, तर काही भागांत जानेवारी महिन्यातही पेरणी सुरू होती..Sesame Farming: उन्हाळी तीळ लागवडीचे शास्त्रीय तंत्र.मागील काही वर्षांपासून खानदेशात तीळ लागवडीखालील क्षेत्र सातत्याने घटत आहे. पूर्वी खरीप व रब्बी किंवा उन्हाळी हंगामात मिळून सात ते आठ हजार हेक्टरवर तीळ पेरणी केली जात होती. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर, अमळनेर, पाचोरा आणि जामनेर हे भाग तीळ उत्पादनासाठी प्रसिद्ध होते. तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा आणि नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, शहादा व नंदुरबार परिसरातही शेतकरी तीळ लागवडीला पसंती देत होते..Summer Sesame Sowing: उन्हाळी तीळ पेरणीची लगबग सुरू.मात्र कमी बाजारभाव आणि अल्प उत्पादनामुळे तीळ लागवडीचे क्षेत्र घटत गेले. मागील हंगामात सुमारे ४०० हेक्टरवर तीळ पीक होते, तर यंदा हे क्षेत्र सुमारे ३०० हेक्टरवर आले आहे. खरीप हंगामात खानदेशात सुमारे दोन हजार हेक्टरवर तीळ पेरणी अपेक्षित होती; मात्र प्रत्यक्षात केवळ ७०० हेक्टरवरच लागवड झाली. खरीप हंगामात पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्याने उत्पादनात घट झाली..तीळ पिकाची लागवड प्रामुख्याने काळ्या कसदार जमिनीत करण्यात आली होती. अशा जमिनीत एकरी दोन क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन मिळू शकते, असे शेतकरी सांगतात. कमी खर्चात आणि कमी पाण्यावर काळ्या कसदार जमिनीत तीळ पीक घेणे शक्य असल्याने काही शेतकरी या पिकाला प्राधान्य देतात. तसेच केळी पिकासाठी तीळ पिकाचे बेवडही फायदेशीर ठरत असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. . बहुतांश भागांत मळणी पूर्ण झाली असून, काही ठिकाणी या आठवड्यात प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.