Raigad News: रायगड जिल्ह्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये मागील वर्षभरात लक्षणीय वाढ झाली आहे. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाने या रुग्णांना दिलेल्या तत्पर व प्रभावी उपचारांमुळे ४१९ जणांचे प्राण वाचले आहेत. एकूण ४२१ सर्पदंशग्रस्त रुग्ण उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. यापैकी बहुसंख्य रुग्णांवर वेळेवर उपचार झाल्याने ते पूर्णपणे बरे झाले असून, उपचारास उशीर झाल्यामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली..रायगड जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम तसेच जंगलालगतच्या भागात सापांचा वावर अधिक आहे. शेतीकाम, घराभोवती वाढलेली झुडपे, रात्रीच्या वेळी अपुरी खबरदारी आणि अंधश्रद्धा यामुळे सर्पदंशाच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सर्पदंश रुग्णांसाठी विशेष तयारी केली आहे..Snakebite Awareness: सर्पदंशावर उतारा.जिल्हा रुग्णालयात अँटी-स्नेक व्हेनमचा पुरेसा साठा, आवश्यक आपत्कालीन औषधे, तसेच प्रशिक्षित डॉक्टर व परिचारिका २४ तास कार्यरत ठेवण्यात आल्या होत्या. रुग्ण दाखल होताच तातडीने तपासण्या करून उपचार सुरू करण्यात येत असल्याने गंभीर अवस्थेतील अनेक रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य झाले..Wildlife In Danger: राष्ट्रीय महामार्ग वन्यजीवांसाठी कर्दनकाळ.डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे सर्पदंश उपचार यशस्वी ठरले असल्याचे प्रशासनाने नमूद केले. दरम्यान, सर्पदंशानंतर पहिल्या काही तासांत उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. वेळेत रुग्णालयात पोहोचलेल्या रुग्णांची प्रकृती लवकर सुधारली, तर उशिरा दाखल झालेल्या काही रुग्णांच्या प्रकृतीत गुंतागुंत निर्माण झाली. दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे..सर्पदंश रुग्णांसाठी विशेष सवलतजिल्हा रुग्णालयात सर्पदंश उपचारासाठी अँटी-स्नेक व्हेनम, आपत्कालीन औषधे आणि प्रशिक्षित वैद्यकीय पथक २४ तास उपलब्ध आहे. रुग्ण दाखल होताच तातडीने उपचार सुरू केले जातात. सर्पदंश झाल्यास घरगुती उपाय किंवा अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवता तत्काळ नजीकच्या शासकीय रुग्णालयात जावे. रात्री टॉर्चचा वापर, घराभोवती स्वच्छता, झुडपे काढणे तसेच पायात चप्पल किंवा बूट घालणे यासारख्या खबरदारीच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी यांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.