Pune News: दमदार पाऊस कोसळल्याने अनेक धरणे यंदा जुलैमध्ये भरली होती. त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणे ओसंडून वाहू लागली आहेत. सध्या राज्यात लहान, मध्यम व मोठे एकूण एकत्रित सुमारे २९९७ इतकी धरणे असून या सर्व धरणांमध्ये सुमारे १२८३.५९ टीएमसी म्हणजेच ८९ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. राज्यातील बहुतांश धरणांतून विसर्ग सोडण्यात येत असल्याने नद्या ओसंडून वाहत आहे..यंदा तीन टक्के अधिक पाणीसाठागतवर्षी याच दिवशी राज्यातील धरणांमधील पाणीसाठा १२३८.३२ टीएमसी म्हणजेच ८६.५० इतका होता. मात्र यावर्षी सुमारे तीन टक्के उपयुक्त पाणीसाठा जास्त आहे. राज्यात एकूण १३८ मोठे पाटबंधारे प्रकल्पांमध्ये आजमितीस सुमारे ९९०.१६ टीएमसी म्हणजेच ९६ टक्के, तर २६० मध्यम पाटबंधारे प्रकल्पांमध्ये सुमारे १५८.८२ टीएमसी म्हणजेच ८१ टक्के आणि २५९९ लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये सुमारे १३४.७२ टीएमसी ६४ इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे..मराठवाड्याला दिलासामराठवाड्यातील जायकवाडी धरणामध्ये सुमारे ७४.५२ टीएमसी म्हणेजच ९७ टक्के एकूण पाणीसाठा झाला झाल्याने धरण पूर्ण संचय पातळी नियमन सूचीनुसार जायकवाडीतून सांडव्याद्वारे सुमारे दोन लाख ८२ हजार ९२२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. तसेच मराठवाड्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरलेली असून येलदरी, माजलगाव, इसापूर (पैनगंगा), मांजरा, विष्णुपुरी, दुधना, सिद्धेश्वर, सीना-कोळेगाव सर्वच प्रमुख धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग सोडण्यात येत आहे. माजलगाव धरणातून सिंदफणा नदीमध्ये सुमारे ९९१३ क्युसेक्स इतका पाणी विसर्ग सोडण्यात येत असून त्यामुळे गोदावरी पात्रात गंगाखेड (परभणी) येथे ४६३१ आणि नांदेड ( जुना पूल) येथे ७६८७ क्युसेक्स इतका पाणी विसर्ग गोदावरी नदी पात्रात सुरू आहे.Girna Dam : गिरणा धरणात पाण्याची आवक.विदर्भातील धरणे ओसंडून वाढताहेतविदर्भातील नागपूर विभागातील पेंच तोतलाडोह, इटियाडोह, सिरपूर, इरई, निम्न वर्धा, गोसीखुर्द, तर अमरावती विभागातील ऊर्ध्व वर्धा, अरुणावती, बेंबळा, काटेपूर्णा, पेनटाकळी, खडकपूर्णा ही धरणे जवळपास शंभर टक्के भरली आहे. त्यामुळे या धरणांमधून देखील मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग सुरू आहे. गोसी खुर्दमधून ७५ हजार ८४६ क्युसेक, निम्न वर्धातून ४८१४, अरूणावतीतून ७०६२, खडकपूर्णातून ४६४३९ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यातील प्राणहिता नदीमध्ये सर्वात जास्त सुमारे ३,८८,४६५ क्युसेक्स इतका मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग सुरू आहे..कोकणातील धरणे भरलीकोकण विभागात एकूण १७३ धरणे असून त्यांमध्ये आजमितीस सुमारे १२२.५७ टीएमसी म्हणजेच ९४ इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे असलेल्या पाच धरणांमध्ये सुमारे १७.७० टीएमसी ९९ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. ठाणे महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या बारावी धरणात सुमारे १२.०५ टीएमसी शंभर टक्के इतका पाणीसाठा आहे. नवी मुंबईसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या मोराबे आणि हेटवणे धरणात एकूण सुमारे ११.५७ टीएमसी म्हणजेच सरासरी ९९ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे..Dam Water Discharge : जायकवाडी धरणातून गोदावरीत सव्वादोन लाख क्युसेकने विसर्ग.मोठ्या धरणांतून विसर्ग सुरूजायकवाडी धरणात यावर्षीचा एक जूनपासून पावसाळ्यामध्ये एकूण १४६.९९ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. यामध्ये नांदूर मध्यमेश्वर (नाशिक) येथून सोडण्यात आलेले सुमारे ७९.७७ टीएमसी पाण्याचा समावेश आहे. आजपर्यंत सांडव्यामधून गोदावरी नदी पात्रात सुमारे ८९.३३ टीएमसी इतके पाणी सोडण्यात आलेले आहे. उजनीतून ८६ हजार ७८० क्युसेक, कोयनातून २० हजार ३६६ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. राजापूर बंधारा (कृष्णा नदी) ५४ हजार क्युसेक्स आणि प्रकाशा बॅरेज (तापी नदी) ४८४०६ क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या अलमट्टी धरणामध्ये १०४.८८ टीएमसी म्हणजेच ९९ पाणीसाठा असून या धरणामधून सुमारे ८९ हजार ९८३ क्युसेक्स इतका पाणी विसर्ग सोडण्यात येत आहे..विभागनिहाय धरणातील उपलब्ध झालेला पाणीसाठा (टीएमसी)विभाग धरणाची संख्या उपलब्ध पाणीसाठा टक्केनागपूर ३८३ १४५.५४ ८८अमरावती २६४ ११८.८१ ८९छत्रपती संभाजीनगर ९२० २१८.८७ ८५नाशिक ५३७ १७९.९७ ८५पुणे ७२० ४९७.८१ ९२कोकण १७३ १२२.५७ ९४एकूण २९९७ १२८३.५९ ८९.जुलैपासून बहुतेक धरणे पूर्णपणे भरली असून यापुढे धरणांमधून सातत्याने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडावा लागणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी पूरहानी, वित्तहानी व इतर नुकसान होऊ नये, यासाठी सतर्कता बाळगणे देखील तितकेच महत्त्वाचे राहणार आहे.इंजि. हरिश्चंद्र चकोर, जलसंपत्ती अभ्यासक व जल सिंचन तज्ज्ञ.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.