Pune News: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जुन्नर तालुक्यातील खरीप हंगामातील तृणधान्य, भाजीपाला व फळ पिकांच्या नुकसानीचे पंचनामे महसूल, पंचायत समिती व कृषी विभागाने केले आहेत. अहवालानुसार तालुक्यातील ५५०६ शेतकऱ्यांचे एकूण तीन हजार ४११ हेक्टर क्षेत्रातील भात, तृणधान्य, भाजीपाला पिके, सोयाबीन, पेरू केळी व द्राक्ष या पिकांचे एकूण चार कोटी ५१ लाख ९१ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाले आहे..तालुक्यातील पंचनाम्याचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना पाठविला असल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाठ व तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी दिली. जुन्नर तालुक्यात मे महिन्यात अतिवृष्टी झाली होती. त्यानंतर सातत्याने पाऊस सुरू आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तृणधान्य,सोयाबीन, भात, भाजीपाला पिके व फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सततचा पाऊस, सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे घड निर्मिती न झाल्याने सर्वाधिक नुकसान द्राक्ष या वार्षिक नगदी पिकांचे झाले आहे..Rain Crop Damage: मॉन्सूनोत्तर पावसाने ४८ हजार हेक्टरवरील पिकांची दैना.पिकांच्या नुकसानीचे पंचनामे दोन टप्प्यांत केले आहेत. पहिल्या टप्प्यात सप्टेंबर महिन्यात भात, सोयाबीन, तृणधान्य, भाजीपाला व फूल पिके, केळी, पेरू या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. कृषी विभागाच्या अहवालानुसार पहिल्या टप्प्यात चार हजार १४० शेतकऱ्यांचे दोन हजार २९४ .९५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे दोन कोटी ७५ हजार ९७५ रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक नुकसान सोयाबीन (एक हजार ४१५ हेक्टर) व भात (७५३.३५ हेक्टर) पिकांचे झाले आहे. .२७ मार्च २०२३ च्या शासन निर्णयानुसार बाधित पिकांना दिलेले हेक्टरी अनुदान (रुपयांत)जिराईत पिके ८ हजार ५०० (एकरी ३ हजार ४०० रुपये)भाजीपाला पिके १७ हजार ( एकरी ६ हजार ८०० रुपये)फळपिके २२ हजार ५०० ( एकरी नऊ हजार रुपये).Heavy Rain Damage : परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी, पुरामुळे खचल्या २१५ विहिरी .अनुदान तुटपुंजेअनुदानाची रक्कम म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा आहे. जिरायती पिकांना एकरी २५ ते ३० हजार रुपये, भाजीपाला पिकांना एकरी एक लाख रुपये, द्राक्ष पिकाला एकरी तीन लाख रुपये खर्च येतो. शासन निर्णयानुसार जिरायती पिकांना एकरी ३ हजार ५०० रुपये, भाजीपाला पिकांना ६ हजार ८०० रुपये, द्राक्षासह इतर फळ पिकांना ९ हजार अनुदान दिले जाते..पहिल्या टप्प्यात केलेल्या पंचनाम्यानुसार दोन हजार २९४ .९५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे दोन कोटी ७५ हजार ९७५ रुपयांचे नुकसान झाले होते. त्यापैकी शासनाकडून अनुदानाची एक कोटी ८० लाख रुपयाची रक्कम उपलब्ध झाली आहे. द्राक्ष पिकासह उर्वरित अनुदान पुढच्या टप्प्यात जमा होईल.गणेश भोसले, जुन्नर तालुका कृषी अधिकारी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.