Satara News: तांबवे गावच्या पश्चिमेला असलेल्या डोंगरकडेला वसलेल्या डेळेवाडी व गमेवाडी परिसरातील शिवारात रानगव्यांनी धुमाकूळ घातल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत..रब्बी हंगामातील हातातोंडाशी आलेली पिके रानगव्यांच्या हल्ल्यामुळे उद्ध्वस्त होत असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रानगव्यांच्या दहशतीमुळे अनेक शेतकरी शेतात जाणे टाळत असून, तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे..Gaur Meal For Poultry Feed : कोंबडी खाद्यामध्ये गवार मीलचा वापर फायदेशीर आहे का?.डेळेवाडी व गमेवाडी ही दोन्ही गावे डोंगरकडेला लागून असल्याने त्या परिसरात झाडीही मोठी आहे. त्या भागातील शेतकरी प्रामुख्याने रब्बी हंगामात शाळू, गहू, मका तसेच विविध कडधान्य व तृणधान्यांची लागवड करतात. सध्या ही पिके चांगली भरात आली असतानाच गेल्या दोन आठवड्यांपासून रानगव्यांचा कळप शिवारात ठाण मांडून बसला आहे. दररोज रात्रीच्या वेळी शेतात घुसून पिकांची नासधूस केली जात आहे..Indian Bison Gaur : गव्याच्या त्रासाने शेतकरी हैराण, उसाच्या होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण?.विशेष म्हणजे हातातोंडाशी आलेली पिके डोळ्यादेखत नष्ट होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. डेळेवाडी येथील अशोक बाबर, जयवंत बाबर, पंढरीनाथ बाबर, दादासाहेब बाबर, विजय खबाले, तात्यासाहेब बाबर, प्रल्हाद देसाई यांच्यासह गमेवाडीतीलही अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही शेतांमध्ये संपूर्ण पिके तुडवली गेली असून, उत्पादनात मोठी घट येण्याची भीती व्यक्त होत आहे..रानगव्यांचा वावर वाढल्याने मानवी जीवितासही धोका निर्माण झाला आहे. रात्री तर सोडाच, दिवसादेखील शेतात जाण्याची शेतकऱ्यांची हिंमत होत नाही. वन विभागाने या परिसरात गस्त वाढवावी, रानगव्यांना जंगलात परतविण्यासाठी तातडीचे उपाययोजना कराव्यात, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.