Reservoirs Benefits: धरणातील साचलेला गाळ काढल्यामुळे पावसाळ्यात अधिक पाणी साठवता येणार असून, त्यामुळे धरणाची जलसाठवण क्षमता आणि आयुष्य वाढण्यास मदत होणार आहे. तसेच धरणातून काढण्यात येणारा सुपीक गाळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात टाकण्यासाठी उपलब्ध करून दिला जात आहे. यामुळे जमिनीची सुपीकता वाढून पीक उत्पादनात लक्षणीय वाढ होईल आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास प्रादेशिक जलसंधारण अधिकारी इंजि. हरिभाऊ गिते यांनी व्यक्त केला..मृदा व जलसंधारण विभागाच्या वतीने राबविण्यात येणारी ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजना जलस्रोतांचे संवर्धन आणि शाश्वत शेती विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. या योजनेअंतर्गत दिंडोरी तालुक्यातील माळे येथील पुणेगाव धरणातील गाळ काढण्याचे काम संजीवनी फाउंडेशन या बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत प्रगतीपथावर आहे..या कामाची पाहणी इंजि. गिते यांनी केली. या वेळी पुणेगाव धरण प्रकल्पाचे उपअभियंता प्रदीप लोधे, माळे-दुमाला येथील सरपंच केदू वाघ, रवी काकड, सागर गायकवाड, अमोल काकड, कीर्ती जायभाये यांच्यासह परिसरातील नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते..Groundwater Recharge: विहिरींचे पुनर्भरण काळाजी गरज! कसे करावे पुनर्भरण?.स्थानिक प्रशासन, मृदा व जलसंधारण विभाग आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून हे काम सुरू करण्यात आले असून, परिसरातील नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे. ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही योजना जलस्रोत संवर्धन आणि शाश्वत शेती विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे..Dam Desilting Approves: सहा मोठ्या धरणांतील गाळ काढण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी.मृदा व जलसंधारण विभागाच्या वतीने नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांत ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. या मोहिमेमुळे संपूर्ण विभागात तब्बल ७२८ कोटी लिटर अतिरिक्त पाणीसाठा वाढणार असून, ७२८० हेक्टर जमीन सुपीक होणार आहे..शेतकऱ्यांना शासनाकडून हेक्टरी ३५ हजारांचे अनुदानया योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना धरणातील गाळ मोफत उपलब्ध करून दिला जात आहे. तसेच शासनाकडून हेक्टरी ३५ हजार रुपये अनुदानही दिले जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतात गाळ नेऊन टाकावा, असे आवाहन मृदा व जलसंधारण विभागातर्फे करण्यात आले आहे. एकट्या पुणेगाव धरणातून १ लाख ३६ हजार ३८ घनमीटर गाळ काढला जाणार असून, त्यामुळे परिसरातील १३६ हेक्टर जमीन सुपीक होणार आहे.या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना धरणातील गाळ मोफत उपलब्ध करून दिला जात आहे. तसेच शासनाकडून हेक्टरी ३५ हजार रुपये अनुदानही दिले जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतात गाळ नेऊन टाकावा, असे आवाहन मृदा व जलसंधारण विभागातर्फे करण्यात आले आहे. एकट्या पुणेगाव धरणातून १ लाख ३६ हजार ३८ घनमीटर गाळ काढला जाणार असून, त्यामुळे परिसरातील १३६ हेक्टर जमीन सुपीक होणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.