प्रमोद बोडके Sahakar Kshetra : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील दुग्ध संस्था व वैयक्तिक सभासद मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीसाठी बिकट स्थिती आहे. दुधातील सहकार संपल्याचा थेट परिणाम या मतदारसंघावर झालेला दिसत आहे. जिल्ह्यातील १ हजार २३६ दुग्ध संस्था जिल्हा बँकेच्या सभासद आहेत, मतदानासाठी मात्र फक्त ११२ संस्था पात्र ठरल्या आहेत. दुग्ध संस्था ११२ आणि ३२१ वैयक्तिक सभासद असे एकूण ४३३ एवढेच मतदार या मतदारसंघात आहेत. दुग्ध संस्थांमधील दोष दुरुस्तीची प्रक्रिया सध्या सुरू असून, या मतदारसंघातील मतदार यादी अंतिम होईपर्यंत पात्र दुग्ध संस्थांच्या संख्येत थोडी वाढ होऊ शकते..जिल्ह्यातील बहुतांश दुग्ध संस्था अडचणीत आल्या आहेत. त्यांची जागा आता गावोगावीच्या चिलिंग सेंटर व बल्क कुलरवाल्यांनी घेतली आहे. सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचीही स्थिती सध्या वाईट असल्याने त्याचा अप्रत्यक्ष परिणाम जिल्हा बँकेच्या या मतदारसंघावर झालेला दिसत आहे. या मतदारसंघातील वैयक्तिक मतदारांचेही वय आता साधारणतः ८० वर्षांच्या पुढे असल्याने या मतदारांच्या शोधासाठी भावी संचालकांना मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत..Ahilyanagar District Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ३ हजारांवर मतदार.सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी या मतदारसंघातून जिल्हा बँकेत संचालक म्हणून काम केले आहे. जिल्ह्यात भाजपचे वाढलेले प्राबल्य, नव्याने झालेले प्रवेश यामुळे यंदाच्या जिल्हा बँक निवडणुकीसाठी समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघातून कोण संचालक होणार, याबद्दल तरी ठोस अंदाज बांधणे कठीण आहे. सोसायटी मतदारसंघातील ११ जागांचे संभाव्य उमेदवार जवळपास निश्चित मानले जात आहेत..Solapur DCC Bank Election: मतदार पात्रतेसाठी १ जुलै हीच ‘कट-ऑफ’ तारीख .या मतदारसंघात सध्या माढा तालुक्याचे वर्चस्व दिसत आहे. याशिवाय माळशिरस, पंढरपूरचेही वर्चस्व आहे. याशिवाय खरेदी-विक्री संघ, नागरी बँका व दुग्ध संस्था या तीन मतदारसंघांतून येणारे संचालक, दोन महिला प्रतिनिधी, एक अनुसूचित जाती/जमाती, एक ओबीसी व एक भटक्या जाती/जमातीमधून येणाऱ्या संचालकांबद्दल आता उत्सुकता निर्माण झाली आहे. ज्या तालुक्यात दोन्ही नेते ताकदवान आहेत, त्या तालुक्यातील एका नेत्याला या आठपैकी एका जागेवर डीसीसीमध्ये सामावून घेतले जाते. त्यामुळे या मतदारसंघातील भावी संचालकाबद्दल शेवटपर्यंत उत्सुकता राहणार आहे..सभासद दुग्ध संस्था, कंसात मतदानाला पात्र संस्थाअक्कलकोट : ४ (०) बार्शी : १३९ (२) करमाळा : ६१ (४)माळशिरस : २४५ (५२) माढा : २६७ (१२) मंगळवेढा : ३८ (५)मोहोळ : ५९ (७) पंढरपूर : १२० (५) सांगोला : २५८ (२३)उ. सोलापूर : २७ (१) द. सोलापूर : १८ (१) एकूण : १,२३६ (११२)तालुकानिहाय वैयक्तिक मतदारअक्कलकोट : ० बार्शी : ५ करमाळा : २०माळशिरस : ९ माढा : ११८ मंगळवेढा : ६मोहोळ : १६ पंढरपूर : ४१ सांगोला : ४दक्षिण सोलापूर : १० उत्तर सोलापूर : ९२ एकूण : ३२१.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.