Dharashiv News: कळंब तालुक्यातील दहीफळसह परिसरात सर्रास सुरू असलेल्या दारू विक्रीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असून, घराघरांत कलह, आर्थिक अडचणी आणि सामाजिक असुरक्षितता वाढत असल्याचा आरोप करीत गावातील महिलांनी आक्रमक भूमिका घेतली. गावात पूर्ण दारूबंदी लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवारी ठिय्या आंदोलन केले. या वेळी सरपंच, ग्रामसेवकांनी निवेदन स्वीकारले..अनेक महिन्यांपासून दहीफळ गावात विनापरवाना दारूविक्री सुरू असल्याने मानसिक व शारीरिक अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे आंदोलनकर्त्या महिलांचे म्हणणे आहे. घर चालवणे कठीण झाले असून, मुलांच्या शिक्षणावरही याचा विपरीत परिणाम होत आहे. .Liquor Ban News : राज्यात संपूर्ण दारूबंदीच्या चर्चेला उधाण; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सूचक विधान! .दारूच्या नशेमुळे घरगुती हिंसाचार, मुलांच्या शिक्षणावर परिणाम, अपघातांचे प्रमाण आणि सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण होत असल्याचे महिलांनी निवेदनात नमूद केले दारू बंद झाली तरच गावात शांतता, सुरक्षितता, विकासाला चालना मिळेल, असा सूर महिलांनी लावला होता. .Illegal Liquor Sale : बेकायदा, बनावट दारूविक्रीला पायबंद.ग्रामपंचायतीकडून कोणत्याही व्यक्तीला दारूविक्रीसाठी नाहरकत प्रमाणपत्र देऊ नये, गावाच्या हद्दीत विनापरवाना दारूविक्री थांबविण्यासाठी पोलिस व महसूल विभागाशी समन्वय साधावा, अशा मागण्या करण्यात आल्या. सरपंच व ग्रामसेवकांनी निवेदन स्वीकारून महिलांच्या मागण्यांवर तातडीने बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले..दारूबंदीबाबत ठराव मंजूर करून संबंधित विभागांकडे पाठवण्यात येईल, तसेच विनापरवाना विक्रीविरोधात कठोर कारवाईसाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन ग्रामपंचायतचे सरपंच चरण पाटील, ग्रामसेवक मडके यांनी दिले. निवेदनावर रत्नमाला रामेश्वर भातलवंडे, अश्विनी गोपीनाथ मते, वंदना दत्तात्रय मते, विद्या सतीश मते, सोनाली तानाजी वरपे, सोनाली ज्ञानेश्वर कुटकर, सलीमा नजीर शेख, निर्मला सुभाष कुटकर, सुमन अशोक गोरे, सुरेखा गोरे आदींच्या सह्या आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.